• Mon. Jun 15th, 2026

    Pune Accident: भरधाव टँकरची दुचाकीला धडक, पुतण्यासमोरच 94 वर्षीय चुलत्यांचा मृत्यू; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात

    Pune Accident: भरधाव टँकरची दुचाकीला धडक, पुतण्यासमोरच 94 वर्षीय चुलत्यांचा मृत्यू; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात

    Pune-Solapur Highway Accident: मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका अज्ञात टँकरच्या धडकेत दुचाकीवरून इंदापूरला जात असताना 94 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दीपक पडकर, इंदापूर: एका टँकर चालकाच्या निष्काळजीपणामुळे 94 वृद्धाला जीव गमवावा लागला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीला भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्यामुळे हा अपघात घडला. यावेळी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळावरून फरार झाला होता.

    दुचाकीला जोरदार धडक

    इंदापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी, 31 मार्च रोजी , संध्याकाळी 5च्या सुमारास ही दुर्घटना घडली. पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यातील वनगळी येथे हा अपघात झाला. सायंकाळी दुचाकी बिजवडी कारखाना पुलाजवळ असताना टोरेंट कंपनीच्या CNG पंपासमोर वेगात जाणाऱ्या टँकरने धडक दिली. यावेळी संदीप किशोर देवकर (वय 43) हे दुचाकी चालवत होते. त्यांच्यासह दुचाकीवर त्यांचे चुलते प्रतापराव विठ्ठल देवकर (वय 94) देखील होते. हे दोघेही इंदापूर तालुक्यातील वरकुटे बु. येथे राहणारे आहे.Maharashtra TimesAccident News: कीर्तनातून समाज प्रबोधन, पण भरधाव ट्रकने घात केला; प्रसिद्ध कीर्तनकारावर काळाचा घाला, भीषण अपघातात मृत्यू

    दुचाकीवरून पुतण्या आणि चुलते इंदापूरच्या दिशेने निघाले होते. यावेळी कारखाना पुलाजवळ मागून एक भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दोघेही दुचाकीवरून खाली फेकले गेले. पण मदतीसाठी न थांबता टँकर चालक घटना स्थळावरून फरार झाला. यावेली प्रतापराव देवकरांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पुतण्या संदीप देवकर हे अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

    चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

    या नंतर त्यांच्या कुटुंबातील प्रवीण यादवराव देवकर यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून अज्ञात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार यादव करत आहेत.

    Maharashtra Timesखंडोबाचं दर्शन ठरलं अखेरचं! दिवे घाटात भरधाव ट्रकच्या धडकेत बाप-लेकीचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

    96 वर्षीय प्रतापराव देवकर हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून त्यांच्या पाश्चानत त्यांच्या पत्नीसह चार मुले, सुना आणि नातवंडांचा मोठा परिवार आहे. त्यांचा मुलगा किशोर देवक हे देखील सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते. दरम्यान, त्यांचे दुसरे पुत्र विजयकुमार देवकर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी शाखा व्यवस्थापक असून एक मुलगा राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका प्रवक्ता देखील होता. त्यांच्या अपघाती मृत्यू नंतर संपूर्ण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा