• Wed. Jun 10th, 2026

    Pune Santosh Pandit: पुण्यातील रीलस्टार संतोष पंडित अडचणीत; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

    Pune Santosh Pandit: पुण्यातील रीलस्टार संतोष पंडित अडचणीत; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

    Pune Crime: महिलांच्या अंगावर धावून जाणे, दमदाटी आणि शिवीगाळ करणे, असे प्रकार संतोष पंडित याने केल्याचे महिला पत्रकाराने दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.

    पुण्यात रीलस्टार संतोष पंडित अडचणीत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : सोशल मीडियावर शहरातील विविध प्रश्नांवर व्हिडिओ बनवणारा रीलस्टार संतोष पंडित हा सध्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आला आहे. एका महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पंडित याच्याविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ३० मार्च रोजी पुणे येथील ग्राहक पेठ परिसरात घडली. ३० मार्च रोजी पुण्यात “गुलाबो गँग”च्या आंदोलनावेळी अनेक कार्यकर्त्या आणि पत्रकार उपस्थित होते. नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू असताना संबंधित महिला पत्रकार वृत्तांकनासाठी तेथे गेल्या होत्या. याच वेळी संतोष पंडित घटनास्थळी पोहोचला आणि त्याची महिला पत्रकारासोबत वादाला सुरुवात झाली. मात्र नंतर या वादाने वेगळं वळण घेतलं.

    महिला पत्रकाराने दिलेल्या तक्रारीनुसार, “तुमच्यामुळे वाहतूक कोंडी होते” असे म्हणत संतोष पंडित याने पत्रकारांशी वाद घातला. मात्र, त्यानंतर त्याने मर्यादा ओलांडत महिला पत्रकारावर अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप आहे. तिच्या कपड्यांवरून अपमानास्पद वक्तव्य करत शिवीगाळ केली. एवढेच नव्हे, तर संबंधित पत्रकाराची परवानगी न घेता तिचा व्हिडिओही मोबाईलमध्ये शूट केल्याचे समोर आले आहे.

    घटनास्थळी उपस्थित आंदोलनकर्त्या महिलांशीही संतोष पंडितने आक्रमक वर्तन केल्याचा आरोप आहे. महिलांच्या अंगावर धावून जाणे, दमदाटी करणे आणि शिवीगाळ करणे असे प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते.

    दरम्यान, या प्रकरणी पुणे पोलीस यांनी तातडीने कारवाई करत पर्वती पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५, ७८, ३५२, ३५१(२) आणि २९६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असून, पंडितविरोधात आणखी काही तक्रारी असल्यास नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा