• Sun. Jun 7th, 2026
    Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा लवकरच महाराष्ट्र दौरा; एप्रिलमध्ये सर्व जिल्ह्यांत भेट देणार

    Sunetra Pawar Maharashtra Daura: पक्षात निर्माण झालेला गोंधळ शमविणे तसेच, पक्ष कार्यकर्त्यांना आधार देण्यासाठी सुनेत्रा पवार यांचा राज्यव्यापी दौरा आयोजित करण्यात येणार आहे.

    सुनेत्रा पवारांचा लवकरच महाराष्ट्र दौरा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांमध्ये हुरुप आणण्यासाठी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राज्यव्यापी दौरा काढणार आहेत. एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पवार भेट देणार आहेत. या दौऱ्याच्या नियोजनाला मंगळवारी पक्षाकडून सुरुवात झाली असून लवकरच तारखा अंतिम करण्यात येणार आहे.

    अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ अपघाती निधन झाले. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर फेब्रुवारीच्या अखेरीस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी सूत्रे हातात घेतली. परंतु, पक्षांतर्गत सर्व काही आलबेल आहे की नाही, याबाबत सातत्याने उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यातच नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोग आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लागला. मंत्री नरहरी झिरवाळ यांची एक कथित क्लिप समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यानेही त्यांच्यावर सातत्याने राजीनाम्यासाठी सातत्याने दबाव येतो आहे.

    लोकसभा-विधानसभा मतदारसंघात वाढ होणार, एकनाथ शिंदेंचं मतदारांना आवाहन

    पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून त्याच्या नियोजनाला सुरुवात करण्यात आली आहे. या माध्यमातून सुनेत्रा पवार यांचे नेतृत्वही राज्यस्तरावर नेण्याचा प्रयत्न करण्याचे नियोजन आहे.

    लोकसभा निवडणूक २०२४च्या पराभवानंतर अजित पवार यांनी राज्यव्यापी दौरा काढत पक्षाचा विचार राज्यभर पसरवला. तसेच, कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण केला. याचा फायदा राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत झाल्याचे दिसून आले होते. त्याचीच पुनरावृत्ती या दौऱ्याच्या माध्यमातून करण्याचा पक्षाचा विचार आहे. दरम्यान, मंगळवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांच्यात सुमारे तीस मिनिटे चर्चा झाली. ही चर्चा पक्षांतर्गत बाबींसाठी झाल्याचे बोलले जात आहे.

    Maharashtra TimesAshwini Bhide: यंदाच्या पावसाळ्यात मुंबई तुंबणार नाही! नवनियुक्त महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची ग्वाही
    कोणताही विभाग वगळला नाही
    राष्ट्रवादीमध्ये फूट पाडण्यासाठी, नेते बदनाम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि सरचिटणीस रोहित पवार यांनी एका एजन्सीला पाच कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांना वेतन देऊन पक्षावर खोटे आरोप करण्यासाठी काही लोकांच्या नेमणुका केल्या आहेत म्हणूनच ते राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे काम करत आहेत, असा खळबळजनक आरोप पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी केला.

    ओबीसी सेल, सामाजिक न्याय सेल, अल्पसंख्याक सेल हे सेल फ्रंटमधून वगळण्यात आले आहे, असा खोटा दावा केला आहे. हे सेल कधीही फ्रंटमध्ये नव्हते तर, ते सेल म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते असे स्पष्ट करताना चव्हाण यांनी पक्षाची घटना आणि निवडणूक आयोगाला दिलेले पत्राची प्रतीच्या आधारे त्यांनी हा दावा खोडून काढला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा