• Mon. Jun 15th, 2026
    खंडोबाचं दर्शन ठरलं अखेरचं! दिवे घाटात भरधाव ट्रकच्या धडकेत बाप-लेकीचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

    Pune Dive Ghat Accident: जेजुरीहून देवदर्शन करुन एक बाप आपल्या दोन लेकरांसोबत आनंदात घरी निघाला होता… पण वाटेतच काळाने गाठलं आणि सगळं काही संपलं. दिवे घाटात झालेल्या भीषण अपघाताने एका कुटुंबाचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाला.

    भरधाव ट्रकच्या धडकेत बाप-लेकीचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    स्नेहल निमगिरे, पुणे : भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत बाप-लेकीचा मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री दिवे घाटात घडली. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे.

    काय घडलं नेमकं?
    सुंदर गंगावणे (३३) हे मुलगी अनन्या (१२) आणि मुलगा सोहम (८) यांना घेऊन रविवारी जेजुरीला गेले होते. खंडोबाचं दर्शन करून तिघेही रात्री उशिरा पुण्याकडे परतत होते. सव्वा बारा दरम्यान घाटातील रस्ता शांत होता, वाहतूकही कमी होती, पण देवाची उरुळी परिसरात अचानक भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की अनन्या थेट ट्रकच्या चाकाखाली सापडली अन् तिचा जागीच मृत्यू झाला. क्षणात आनंदाचं दुःखात रूपांतर झालं. सुंदर गंगावणे रस्त्यावर फेकले गेले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता.

    Maharashtra TimesPune News: ड्युटीवर जायला निघाले, पण अर्ध्या वाटेतून माघारी; कुटुंब अनभिज्ञ, CRPF जवानाचा संशयास्पद शेवट
    अपघात होताच आसपासचे लोक धावत आले. अॅम्ब्युलन्सला फोन केला, तर काही जणांनी त्यांना उचलून मदत केली. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांचे प्रयत्न अपुरे पडले, उपचार सुरू असतानाच सुंदर गंगावणे यांचाही मृत्यू झाला. एका रात्रीत बाप-लेकीचा जीव गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात ८ वर्षांचा सोहम जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

    Maharashtra TimesCA, बिल्डरांची भोंदूबाबा अशोक खरातला साथ; Ravindra Dhangekar यांनी घेतली मोठी नावं, मालमत्तेच्या चौकशीची मागणी
    या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचालक हनुमंत मलकापूरे याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. दिवे घाटात असे अपघात वारंवार घडत असल्याने पुन्हा एकदा वेग आणि निष्काळजीपणाचा मुद्दा समोर आला आहे. किती जीव गेल्यावर लोक सावध होणार, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा