• Wed. Jun 17th, 2026

    Navi Mumbai Buses: नवे विमानतळ, वाढत्या लोकसंख्येमुळे सार्वजनिक वाहतुकीकडे कल, ‘एनएमएमटी’चा पर्यावरणपूरक प्रवासावर भर; 250 बसची खरेदी

    Navi Mumbai Buses: नवे विमानतळ, वाढत्या लोकसंख्येमुळे सार्वजनिक वाहतुकीकडे कल, ‘एनएमएमटी’चा पर्यावरणपूरक प्रवासावर भर; 250 बसची खरेदी

    NMMT Buses: नवी मुंबई शहराती वाढती लोकसंख्या आणि नवीन सुरू झालेल्या विमानतळाकडील वाहतुकीमुळे शहरांत नव्या बस खरेदी केल्या जाणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात पर्यावरणपूरक प्रवासावर भर देण्यात आली.

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचा २०२६-२७- या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प विशेष सभेत सादर करण्यात आला. यावर्षीच्या परिवहनच्या अर्थसंकल्पात पर्यावरणपूरक प्रवासाबरोबरच वाहतूकबाह्य उत्पन्नवाढीवर भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रवाशांना अधिक चांगल्या प्रवासी सुविधा मिळाव्यात यासाठी या नवीन वर्षात दोनशे बस खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे.

    अर्थसंकल्पात तरतूद

    या अर्थसंकल्पात ९ लाख ५५ हजार आरंभीच्या शिल्लकेसह महसुली व भांडवली उत्पन्न ६५२ कोटी रुपये तर खर्च ६५१ कोटी ९० लाख रुपये असा समतोल साधण्यात आला आहे. परिवहन समिती सभापती विकास झंझाड यांनी तयार केलेले अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर करण्यात आले होते. त्यानुसार स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी सोमवारी विशेष सभेत महापौर सुजाता पाटील यांच्याकडे हा अर्थसंकल्प सादर केला.Maharashtra TimesAtal Setu: दररोज 250 रुपयांचा टोल पडतोय भारी! अटल सेतूकडे सर्वसामान्यांची पाठ; 26 महिन्यांत अपेक्षेहून निम्मीच वाहतूक

    नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या, नवीन सुरू झालेले विमानतळ आणि सार्वजनिक वाहतुकीची वाढती गरज लक्षात घेता परिवहन सेवेत मोठे बदल व सुधारणा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर नवीन बसमार्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    नवी मुंबई परिवहन सेवेत अत्याधुनिक आयटीएमएस प्रणाली लागू करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे बसचे वेळापत्रक, वाहतूक व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि प्रवाशांना वेळेवर सेवा देणे अधिक प्रभावीपणे शक्य होणार आहे. यामुळे प्रवाशांना बस वाहतूक संदर्भातील माहिती आपल्या मोबाइलवर सहज उपलब्ध होणार आहे.

    सीएनजी, इलेक्ट्रीक बस खरेदीकडे कल

    या नवीन वर्षात परिवहनच्या ताब्यात दीडशे सीएनजीवरील बस दाखल होणार आहेत. त्याचबरोबर यात आणखी भर टाकत केंद्र शासनाच्या पीएमई बस सेवेअंतर्गत १०० इलेक्ट्रिकल बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. त्यामुळे परिवारांच्या ताब्यात या आर्थिक वर्षात २५० नवीन बस उपलब्ध होणार आहे.

    Maharashtra TimesGateway to Mandwa Ferry: गेटवे-मांडवा बोटसेवेत प्रवाशांची लूट, वातानुकूलित आणि खुल्या डेकसाठी समान दर; ‘पीएनपी’कडून गैरप्रकार

    महामार्गावर दहा किमी कोंडी

    मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वांद्री नदीच्या पुलाच्या दुरुस्तीमुळे गेली दोन दिवस मनोर मस्तान नाका ते वरई नाक्यादरम्यान आठ ते दहा किमीपर्यंत मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पुलावर वाहतूक संथ केल्याने अनेक वाहने ठिकठिकाणी अडकून पडली आहेत. काही वाहनांनी पर्यायी मार्ग म्हणून मस्तान नाका-वाडा-भिवंडी-ठाणे तर, काहींनी सफाळा-जलसरमार्गे विरारपर्यंत मार्ग बदलल्याचे दिसून आले.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा