Chhatrapati sambhajinagar news: पोलिसांनी समीरचा मोबाईल फोनही ताब्यात घेतला असून, त्यावरून त्याने कोणाशी संवाद साधला होता किंवा हे अवैध शस्त्र कोणाकडून मागवले होते, याचा तांत्रिक तपास आता केला जात आहे.
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: शहरातील सिडको एन-६ भागात शनिवारी रात्री एका तरुणाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर रुग्णालयात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. समीर नाईक वय ३४, रा. सिडको एन-६ असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमधील सिडको परिसरात राहणारा समीर हा व्यवसायाने पुरोहित होता आणि धार्मिक विधी करून आपला उदरनिर्वाह करत असे. तो आपली आई आणि धाकट्या भावासोबत राहत होता. शनिवारी रात्री घरात कोणीही नसताना समीरने टोकाचे पाऊल उचलले. त्याने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली. काही वेळाने आई घरी परतल्यावर समीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. तिच्या आरडाओरडामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. “मी समीर नाईक गुरुजी, स्वतःच्या मर्जीने जीव देत आहे,” अशी सुसाईड नोट त्याने लिहून ठेवली होती.
उज्जैन कनेक्शन अन् शस्त्रांचा साठा समीरच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी जेव्हा त्याच्या खोलीची झडती घेतली, तेव्हा तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. समीरने आत्महत्येसाठी वापरलेली बंदूक त्याने मध्य प्रदेशातील उज्जैन येथून आणल्याचा पोलिसांना संशय आहे. तो महादेवाचा निस्सीम भक्त असल्याने वारंवार उज्जैनला जात असे आणि काही वर्षे तिथे वास्तव्यासही होता. तिथल्याच एखाद्या गावठी कट्टे पुरवणाऱ्या टोळीकडून त्याने हे शस्त्र मिळवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खोलीत नशेच्या पदार्थांचा साठा आणि मुद्देमाल जप्त एका पुरोहित तरुणाच्या खोलीत पोलिसांना तपासादरम्यान तब्बल ३५० भांगसदृश गोळ्या आणि १५० ते २०० दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या आहेत. याशिवाय एक एअरगन देखील जप्त करण्यात आली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा