Vijay Shivtare Kidney Transplant : कर्तव्यदक्ष मुलगीच आणि सजग डॉक्टर या नात्याने डॉ. ममता यांनी वडील विजय शिवतारे यांना प्राणघातक संकटातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्यावर सोमवारी मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. मुलगी डॉ. ममता शिवतारे यांनी विजय शिवतारे यांना एक किडनी दिली. मुंबईतील खासगी रुग्णालयात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.
वडिलांना किडनीदान
गेल्या काही वर्षांपासून शिवतारे यांना किडनीविकाराचा त्रास होता. त्यामुळे त्यांना डायलिसिसद्वारे उपचार देण्यात येत होते. सोमवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर विजय शिवतारे आणि ममता शिवतारे या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मृत्यूशी झुंज देणाऱ्या आपल्या पित्याला नवजीवन देण्यासाठी ममता यांनी स्वतःची किडनी दान केली आहे.
जन्मदात्याला नवजन्माचं गिफ्ट
एक कर्तव्यदक्ष मुलगीच नाही, तर डॉक्टर या नात्याने डॉ. ममता यांनी वडिलांना प्राणघातक संकटातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. स्वतःची किडनी दान करत जन्मदात्यालाच नवीन जीवन दिलं. ममता या आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या पत्नी आहेत. Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचं ‘ऑपरेशन तुतारी’, दिल्ली दौऱ्यानंतर हालचाली, शरद पवारांचे खासदार शिवसेना प्रवेशाच्या तयारीत असल्याची चर्चा
कोण आहेत विजय शिवतारे?
विजय शिवतारे हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. २००९ आणि २०१४ असा सलग दोन वेळा त्यांनी विजय मिळवला होता. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. विजय शिवतारे आणि अजित पवार हे पारंपरिक विरोधक मानले जात. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी विजय शिवतारेंना सांगून पाडलं होतं. मात्र २०२४ मध्ये राजकीय समीकरण बदलली. शिवसेना आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडली. फुटलेली राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपची युती झाली. शिवतारे शिंदेंच्या पक्षात सामील झाले.
महिला आयोग काय काय करू शकतं? अधिकारांमध्ये किती ताकद?
शिवतारेंनी पुन्हा जोरदार मुसंडी मारत विजयश्री खेचून आणली. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार असताना दादा आणि विजय शिवतारे यांचं मन जुळवण्यासाठी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांना मोठी कसरत करावी लागली होती. Uddhav Thackeray : आपण गाफील राहिलो, भाजपने लोकसभेतील अपयशानंतर विधानसभेला अधिक मेहनत घेतली; उद्धव ठाकरेंचं चिंतन, आता आपण झटायला हवं विजय शिवतारे यांनी यापूर्वी राज्य मंत्रिमंडळात जलसंपदा राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव ते काही काळ सक्रिय राजकारणापासून दूर राहिले होते, मात्र आता शस्त्रक्रियेनंतर ते पुन्हा जोमाने जनसेवेत उतरतील, असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा