• Sat. Jun 6th, 2026
    Jalna News : क्षणात सगळं संपलं! भरधाव ट्रक झाडावर आदळला, दोन जिवाभावाच्या सोबत्यांचा करुण अंत

    Jalna Road Accident: जालना शहरात सेंट मेरी स्कूलजवळ भरधाव आयशर ट्रक झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चालक सुरेश पालवे आणि अविनाश लोंढे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. जिंतूरहून शिर्डीला जाताना हा अपघात घडला आहे.

    जालना शहरात ट्रकचा भीषण अपघात दोन ठार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    योगेश काकफळे, जालना : जालना शहरातून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील सेंट मेरी स्कूल परिसरात एका भरधाव ट्रकचा भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अनियंत्रित ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात धडकला. ही धडक इतकी भीषण होती की ट्रकच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

    नेमकी घटना काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आयशर ट्रक हा जिंतूरहून शिर्डीच्या दिशेने जात होता. जालना शहरातील सेंट मेरी स्कूलजवळून जात असताना ट्रकचा वेग प्रचंड होता. अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याशेजारील मोठ्या झाडावर जाऊन आदळला. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी धावून आले. ट्रकची अवस्था पाहून उपस्थित नागरिकही हादरून गेले.

    मृतांची ओळख

    अपघात झाला तेव्हा ट्रकचे केबिन पूर्णपणे दाबले गेले होते, ज्यामध्ये चालक आणि त्याचा सहकारी गंभीर जखमी होऊन अडकले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती जालना पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अडकलेल्या दोघांना बाहेर काढले आणि तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

    Maharashtra TimesAshok Kharat Case : खरात कुटुंबावर SITचा फास; तृप्तबाला बंगल्यातून मुलगा ताब्यात, पत्नी कल्पना खरात फरार

    पोलिसांनी मृतांच्या खिशातील कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटवली आहे. सुरेश भगवान पालवे (चालक) आणि अविनाश नारायण लोंढे, अशी मृतांची नावे निष्पन्न झाली आहेत. हे दोन्ही तरुण कामानिमित्त शिर्डीकडे जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली.

    परिसरात हळहळ

    प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे. या घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करून रस्ता मोकळा केला. दोन तरुण जिवाभावाच्या सोबत्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने जालना आणि त्यांच्या मूळ गावी मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा