• Thu. Jun 11th, 2026

    Atal Setu: दररोज 250 रुपयांचा टोल पडतोय भारी! अटल सेतूकडे सर्वसामान्यांची पाठ; 26 महिन्यांत अपेक्षेहून निम्मीच वाहतूक

    Atal Setu: दररोज 250 रुपयांचा टोल पडतोय भारी! अटल सेतूकडे सर्वसामान्यांची पाठ; 26 महिन्यांत अपेक्षेहून निम्मीच वाहतूक

    Mumbai Atal Setu Traffic: मुंबई ला नवी मुंबईशी अवघ्या 20 मिनिटांत जोडणाऱ्या अटल सेतूकडे सर्वसामान्यांनी नापसंती दर्शवली आहे. एका फेरीला 250 रुपये टोल परवडट नसल्यामुळे वाहनचालकांना तो परवडत नाही.

    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मोठा गाजावाजा करीत हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अर्थात अटल सेतूवर वाहनांची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या २६ महिन्यांत दोन कोटी वाहनांनी या सेतूवरून प्रवास केला असला तरी प्रत्यक्षात अपेक्षित असलेल्या वाहनांच्या तुलनेत ही संख्या केवळ निम्मीच असल्याची बाब समोर आली आहे.

    गेल्या २६ महिन्यांत एक कोटी ८१ लाख ९५ हजार ७१८ खासगी कार, एसयूव्ही आणि वैयक्तिक वापरातील वाहने अटल सेतूवरून धावली. लघू व्यावसायिक वाहने, मिनीबस, बस आणि ट्रक यांची संख्या पाच लाख ९८ हजार ५२५ वर पोहोचली आहे. १२ लाख सहा हजार ०७३ अवजड वाहनांची नोंद झाली आहे, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नुकतीच ‘एक्स’द्वारे जाहीर केली.

    Maharashtra TimesGateway to Mandwa Ferry: गेटवे-मांडवा बोटसेवेत प्रवाशांची लूट, वातानुकूलित आणि खुल्या डेकसाठी समान दर; ‘पीएनपी’कडून गैरप्रकार

    56 हजार वाहनांची अपेक्षा

    ‘एमएमआरडीए’ने दिलेल्या आकडेवारीनुसार रोज सरासरी २५,४७८ वाहने अटल सेतूवरून धावली. प्रत्यक्षात अटल सेतू सुरू झाल्यावर रोज ५६ हजारांहून अधिक वाहने रोज धावतील, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला होता. यामुळे प्रत्यक्ष वापर अंदाजापेक्षा निम्म्याहून कमी ठरला आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत १३ जानेवारी २०२४ रोजी अटल सेतू वाहतुकीसाठी खुला केला. उद्घाटनानंतरच्या पहिल्याच वर्षात वाहतुकीचा वेग अपेक्षेइतका वाढला नाही. उद्घाटनानंतरच अटल सेतूवरील टोलचा दर हा सर्वसामान्यांसाठी चर्चेचा विषय ठरला होता. रोज ये-जा करणाऱ्या खासगी कारधारकांना २५० रुपयांचा टोल भरणे परवडणारे नाही, अशी तक्रार सातत्याने वाहनधारकांनी केली होती. यामुळेच पहिल्या १२ महिन्यांत रोज सरासरी २२,६८९ वाहनांचीच नोंद झाली होती.

    अटल सेतूवरील आकडे समाजमाध्यमांवर देणे, यूट्युबर किंवा इन्फ्लूएन्सर्सचा वापर करून प्रकल्पाचे रिल्स बनवणे यांपेक्षा ‘एमएमआरडीए’ने टोल कमी करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. हजारो कोटी रुपये खर्च करूनही त्यावरून अपेक्षित वाहने धावत नसतील तर ही बाब स्वीकारून प्रवासीकेंद्री उपाययोजना करणे गरजेचे आहे.

    Maharashtra TimesMumbai Melody Road: ‘मेलडी रोड’च्या निर्णयावर महापालिकेचा यू-टर्न; फक्त रात्री बॅरिकेड्स, दिवसभर नियमित वाहतूक सुरू

    जादा टोलमुळे पाठ

    अटल सेतूचा टोल वाजवीपेक्षा जास्त असल्याने वाहनचालकांनी या मार्गाकडे पाठ फिरवल्याचे या सेतूवरील वाहनसंख्येवरून स्पष्ट दिसून येते. यामुळे अजूनही जुन्या वाशी-पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी कायम आहे. त्यामुळे प्रवास वेळ वाढतोच, शिवाय प्रदूषणातही भर पडत आहे, असे वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा