• Sun. Jun 14th, 2026
    Vijay Suryavanshi : ‘पिंपरी-चिंचवडला जगात कोण ओळखतं?’; महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी वादाच्या भोवऱ्यात, वादग्रस्त वक्तव्य अंगलट येणार?

    Commissioner Vijay Suryavanshi Controversial Statement : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी एका पत्रकार परिषदेत शहराच्या ओळखीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

    महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी वादग्रस्त विधान(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे शहरात संताप आणि नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. ‘पिंपरी-चिंचवडला या जगात कोण ओळखतं?’ असं वक्तव्य त्यांनी केल्याचं समोर आल्यानंतर नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    ज्या पिंपरी-चिंचवड शहराला ज्येष्ठ नेते शरद पवार, स्वर्गीय रामकृष्ण मोरे आणि स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या विकसित करत देशात एक मॉडेल शहर म्हणून उभं केलं. त्या शहराच्या ओळखीवरच प्रश्न उपस्थित झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आगामी सर्वसाधारण सभेत या वक्तव्यावरून जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.
    Maharashtra TimesAhilyanagar News : अवकाळीने तोंडचा घास हिरावला, वीज कोसळल्याने घरचा कर्ता माणूस गेला; खेडकर कुटुंबावर एकाचवेळी दुहेरी संकट

    ‘पिंपरी-चिंचवड शहराला ओळख नाही’

    गांधर्व मंच संगीत स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी हे विधान केलं. त्यांच्या मते, ‘गांधर्व मंचला जगभरात ओळख मिळाली आहे, मात्र पिंपरी-चिंचवड शहराला ओळख नाही,’ असं ते म्हणाले. या वक्तव्यावर उपस्थित पत्रकारांनीही नाराजी व्यक्त केली. प्रत्यक्षात पिंपरी-चिंचवड शहराची ओळख ही औद्योगिक नगरी आणि आयटी हब म्हणून देश-विदेशात प्रस्थापित झाली आहे. देशाच्या विविध भागांतून आलेले नागरिक येथे वास्तव्यास असून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी येथे आपले प्रकल्प उभारले आहेत. शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी स्वर्गीय अजित पवार यांनी मोठे योगदान दिले असल्याचं मानलं जातं. त्यांच्या कार्यकाळात शहराचा चेहरामोहरा बदलल्याचं नागरिक सांगतात.

    ‘शहराचा वाली कोण?’

    याच पार्श्वभूमीवर, राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांची या वक्तव्यावर काय भूमिका असणार. तसेच भाजप यावर प्रतिक्रिया देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अनेक जाणकार व्यक्तींच्या मते, आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी शहराचा इतिहास, विकास आणि ओळख याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. दरम्यान, ‘जर स्वर्गीय अजित पवार आज हयात असते, तर त्यांनी या वक्तव्यावरून कठोर शब्दांत फटकारले असते,’ अशा प्रतिक्रिया देखील व्यक्त होत आहेत. त्यामुळे ‘शहराचा वाली कोण?’ असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
    Maharashtra TimesVijay Shivtare : मृत्यूशी झुंजणाऱ्या विजय शिवतारेंना नवजीवन, डॉक्टर लेकीकडून किडनीदान, मुंबईत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

    जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिल ते ७ जून दरम्यान गांधर्व मंच संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संतपीठ परिसरात पार पडणार असून या कार्यक्रमाच्या निमित्तानेच ही वादग्रस्त चर्चा रंगली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा