• Sat. Jun 13th, 2026

    Narahari Zirwal: नरहरी झिरवाळ प्रकरणाला वेगळं वळण! तृतीयपंथीयाकडून भावाविरोधातच गुन्हा दाखल, त्यानेच व्हिडिओ बनवला; कारणही सांगितलं

    Narahari Zirwal: नरहरी झिरवाळ प्रकरणाला वेगळं वळण! तृतीयपंथीयाकडून भावाविरोधातच गुन्हा दाखल, त्यानेच व्हिडिओ बनवला; कारणही सांगितलं

    Narahari Zirwal Viral Video: नरहरी झिरवाळ कथित व्हिडिओ प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं असून कफ परेड पोलीस ठाण्यात व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नरहरी झिरवाळ प्रकरणाला वेगळं वळण; तृतीयपंथीयाची पोलिसात धाव, व्हिडिओ बनवणाऱ्या भावावर गंभीर आरोप करत गुन्हा दाखल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: शासकीय निवासस्थानी एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ वादात सापडले आहेत. शासकीय निवासस्थानाचा चुकीचा वापर केल्याचा आरोप करत त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. मात्र या प्रकरणात आता नवा ट्विस्ट निर्माण झाला असून व्हिडिओत मंत्री झिरवाळ यांच्यासोबत दिसणाऱ्या व्यक्तीने पोलिसात धाव घेत आपल्या भावाविरोधात तक्रार दिली आहे. तृतीयपंथी व्यक्तीच्या तक्रारीनंतर त्याच्या भावाविरुद्ध कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तृतीयपंथीयाने पोलिसात धाव घेत आपल्या भावाने आधी ब्लॅकमेलिंग करत नंतर व्हिडिओमध्ये छेडछाड करत तो व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. सदर व्हिडिओ मूळ स्वरुपातील नसून तो नंतर एडिट करत त्यामध्ये छेडछाड करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे एखाद्याच्या गोपनीयतेचा भंग करणे, बदनामीकारक मजकूर पसरवणे व धमकावणे या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९ व ३५१(१) सह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    झिरवाळांनी काय दावा केला होता?

    राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी व्हायरल व्हिडीओसंदर्भात फोनवरुन संपर्क साधून माहिती दिली आहे. त्यानंतर मी त्यांना सदर व्हिडीओबाबत पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितलं होतं. झिरवाळ यांच्याशी संबंधित एक कथित व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झाल्यानंतर झिरवाळांवर कारवाई करणार का, असा प्रश्न शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्री झिरवाळ यांनी माझ्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. जो व्हिडिओ व्हायरल होतोय, तो तीन-चार व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार केला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नरहरी झिरवाळ यांनी आपल्याकडे केल्याचं मुखअयमंत्री म्हणाले होते.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा