• Sat. Jun 6th, 2026
    आपण गाफील राहिलो, भाजपने लोकसभेतील अपयशानंतर विधानसभेला अधिक मेहनत घेतली; उद्धव ठाकरेंचं चिंतन

    Maharashtra Politics : विरोधी पक्षातील आमच्या काही सहकाऱ्यांनी तर आगामी विधानसभा आपलीच असे समजून मंत्रिपदाची जॅकेटेही शिवली, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लावला

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘लोकसभा निवडणुकीतील यशामुळे आपण विधानसभेला गाफील राहिलो, याउलट भाजपने मात्र लोकसभेतील अपयशानंतर विधानसभेला अधिक मेहनत घेत संधी साधली. त्यामुळे आगामी काळात अतिआत्मविश्वासाने हुरळून न जाता जमिनीवर काम करायला हवे. विरोधी पक्षाची निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आपण झटायला हवे’, अशा शब्दांत शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

    शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या जिल्हाप्रमुख आणि मुंबईतील नगरसेवकांची बैठक पार पडली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून राज्यभरात विविध सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे नियोजनही या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आले.

    उद्धव ठाकरे काय म्हणाले?

    ‘मागच्या लोकसभेच्या यशानंतर आपण सर्वच गाफील राहिलो. विरोधी पक्षातील आमच्या काही सहकाऱ्यांनी तर आगामी विधानसभा आपलीच असे समजून मंत्रिपदाची जॅकेटेही शिवली. मात्र आता आपल्याला असे न करता जमिनीवर राहून काम करायला हवे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी मुंबईतील नगरसेवकांकडे राज्यातील जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली.
    Maharashtra TimesMaharashtra Politics : एकनाथ शिंदेंचं ‘ऑपरेशन तुतारी’, दिल्ली दौऱ्यानंतर हालचाली, शरद पवारांचे खासदार शिवसेना प्रवेशाच्या तयारीत असल्याची चर्चा
    या बैठकीत युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आपले विचार मांडले आणि संघटनेत तरुणांचा सहभाग वाढवण्याची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, पक्षाला बळकट करण्यासाठी तरुणांना सक्रिय आणि जबाबदार बनवणे आवश्यक आहे, जेणेकरून स्थानिक आणि राज्यस्तरीय कार्यक्रम सुरळीतपणे पार पडू शकतील.

    नीलम गोऱ्हे दोनदा अशोक खरातच्या ऑफिसला गेल्या, तृप्ती देसाईंची कारवाईची मागणी

    शिवसेना नेत्यांचे मार्गदर्शन

    या वेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, आमदार आदित्य ठाकरे, सचिव मिलिंद नार्वेकर, सूरज चव्हाण, सुधीर साळवी उपस्थित होते.
    Maharashtra TimesAshwini Bhide : फडणवीसांचा आग्रह, ‘मेट्रो वुमन’ होणार BMC आयुक्त, शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर अश्विनी भिडेंचा मार्ग मोकळा
    शिवसेना नेते सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांनी संघटनेच्या विविध विभागांच्या कामकाजावर चर्चा केली आणि पक्षात उत्तम समन्वय व सांघिक कार्य कसे वाढवता येईल यावर सूचना केल्या. शिवसेना नेते आणि सचिव विनायक राऊत यांनी संघटनेत शिस्त आणि पारदर्शकतेच्या महत्त्वावर भर दिला, तर अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये संवाद आणि प्रशिक्षणाच्या महत्त्वावर आपले विचार व्यक्त केले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा