• Tue. Jun 9th, 2026
    MHADA Lottery 2026 : म्हाडाच्या 2640 घरांसाठी आजपासून अर्ज सुरू; उत्पन्नानुसार कोणत्या गटाला किती घरं? महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या

    मुंबईत घर घेऊन इच्छिणाऱ्यांसाठी म्हाडाच्या मुंबई मंडळानं विविध गटांतील 2 हजार 640 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. आजपासून यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यात विक्रोळी, गोरेगाव, वांद्रे यांसह अनेक भागांतील घरांचा समावेश आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 29 एप्रिल असून 15 मे रोजी विजेत्यांची सोडत काढली जाईल.

    मुंबई म्हाडा लॉटरी २०२६ उत्पन्न गटानुसार घरांची संख्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबईमध्ये स्वप्नातलं घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घडामोड आहे. आता म्हाडानं मुंबईमधील 2640 घरांच्या विक्रीसाठीची लॉटरी काढली आहे. या लॉटरीमध्ये मुंबईतील विविध घरांचा समावेश आहे. मुंबईमधील विविध भागांमध्ये परवडणाऱ्या घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली आहे. ही घरं विविध उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला 30 मार्च पासून म्हणजेच आजपासून सुरुवात होणार आहे. तर 5 मे रोजी घरांच्या लॉटरीची सोडत निघणार आहे.

    उत्पन्न गटानुसार घरांची संख्या

    याच्यामध्ये 145 घर ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत. तर अल्प उत्पन्न गटासाठी 858 घर आहेत. जे या कॅटेगरीमध्ये बसतात त्यांच्यासाठी हा आकडा महत्त्वाचा आहे. मध्यम उत्पन्न ज्यांचा आहे, त्यांच्यासाठी 1408 घरं आहेत. तर उच्च उत्पन्न गटासाठी 229 घर असणार आहेत.

    लॉटरीसाठी महत्त्वाच्या तारखा

    ऑनलाईन अर्ज नोंदणी 30 मार्च रोजी दुपारी तीन वाजल्यापासून सुरू होणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करणे 29 एप्रिल 2026 रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत तुम्हाला अर्ज भरता येतील. त्यानंतर ऑनलाईन अनामत रक्कम 30 एप्रिल 2026 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत भरता येणार आहे.

    Maharashtra TimesSatara News : साताऱ्याचे एसपी तुषार दोशींना पाठवलं सक्तीच्या रजेवर, जिल्हा परिषद राडा प्रकरणात काय-काय घडलं? वाचा A टू Z

    कुठे मिळणार आहेत ही घरं?

    दरम्यान, मुंबईमध्ये कुठे कुठे ही म्हाडाची घर असतील तेही तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कन्नमवार नगर विक्रोळी या ठिकाणी यापैकी काही घरं आहेत. तर पत्राचाळ सिद्धार्थनगर, गोरेगाव या ठिकाणची सुद्धा काही घर यामध्ये सामाविष्ट करण्यात आली आहेत. म्हाडाच्या या लॉटरीमध्ये पहाडी गोरेगाव इथलीही काही घर आहेत. तर जुने मागाठाणे, बोरीवली इथलीही घरं या यंदाच्या लॉटरीमध्ये आहेत. गोराई बोरीवली इथली ही घरं या लॉटरीमध्ये आहेत.

    याशिवाय सुभाषनगर, चेंबूरमधली घर सुद्धा यामध्ये आहेत. गांधीनगर-वांद्रे इथली ही घरं या लॉटरीमध्ये आहेत. पंतनगर घाटकोपरमधील घरांचाही समावेश या लॉटरीमध्ये आहे. दरम्यान गिरगाव मध्ये सुद्धा गिरगाव मधली ही घरं या यंदाच्या लॉटरीमध्ये असतील. त्याच्यानंतर कोपरी, तुंगा पवईमधलीही घरं या लॉटरीमध्ये असतील. याशिवाय माजगाव, लोकमान्य नगर, दादर, अंटॉप हिल वडाळामधील घरांचाही यंदाच्या लॉटरीमध्ये समावेश आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा