सातारा जिल्हा परिषदेतील राडा प्रकरणी आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. साताराचे एसपी तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं? याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत झालेला राडा पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या चांगलाच अंगलट आला आहे. जिल्हा परिषदेतील राडा आणि मंत्री शंभूराज देसाई, मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांना झालेल्या धक्काबुक्कीची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मार्फत चौकशी केली जाणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. यासंदर्भात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तसे संकेत दिले आहेत. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत अपहरण नाट्य, धक्काबुक्की आणि मोठा तणाव पाहायला मिळाला होता. एका सदस्यालच्या अपहरणाच्या गुन्ह्यात सभागृहाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला होता. भाजपने पोलीस बळाचा वापर करून राष्ट्रवादीच्या सदस्यांना अटक करण्यास भाग पाडल्याचा आरोप देखील झाला होता.
या गोंधळातच निवडणूक पार पडली आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी भाजपचे उमेदवार निवडून आले. या गोंधळाचे आणि पोलिसांनी मंत्र्यांना केलेल्या धक्काबुक्कीचे पडसाद थेट विधान परिषदेत उमटले. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड टीका झाली. त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशींना निलंबित करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाची कार्यकारी समिती चौकशी करेल, असे सांगून तुषार दोशींना वाचविण्याचा प्रयत्न केला.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तुषार दोशी अचानक रजेवर गेल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. पोलीस महासंचालकांनी दोशींना सक्तीच्या रजेवर पाठवले असताना अर्जित रजा मंजूर झाली असून कार्यभार अप्पर पोलीस अधीक्षकांकडे सोपवल्याच्या आदेशाची प्रत पद्धतशीरपणे माध्यमांपर्यंत पोहचविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेतील राडा प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत ते रजेवर असणार आहेत.
दरम्यान, पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा २१ एप्रिल २०२५ रोजी निकाल लागला. त्या निकालात कोर्टाने गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त तुषार दोशींवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्याची देखील टांगती तलवार दोशींवर आहे. त्या प्रकरणात तुषार दोशींनी जाणीवपूर्वक तीन नंबरच्या आरोपीला माफीचा साक्षीदार होऊ दिले नाही, असा थेट आरोप अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केला आहे. तसेच मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला अटक केल्यानंतर त्यांच्या मोबाईल ताब्यात घेऊन तपास केला नाही. अन्यथा आणखी महत्त्वाची माहिती समोर आली असती. दोन नंबरचा आरोपी निर्दोष सुटला नसता, असा दावा देखील राजू गोरे यांनी केला आहे.
शंभूराज देसाई नेमकं काय म्हणाले?
“तुमची जशी माध्यमांची सूत्रे असतात तसे आमच्याही काही सूत्रांनी मला सकाळी सांगितलं की, साताराच्या एसपींना आजपासून सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. आता मला माहिती घ्यावी लागेल. कारण आज पहिली वर्किंग डे आहे. मी माझ्या मंत्रालयीन कार्यालयाला सूचना देतो की, काय वस्तुस्थिती आहे त्याची माहिती घेऊन मला सांगा. पण एसपींना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे हे माध्यमांमध्येही येत आहे”, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
“मला सकाळी माहिती मिळाली की, ते साताऱ्याच्या कार्यालयात नाहीत. त्यांना मुख्यालय सोडून जायची परवानगी मिळाली आहे, अशी मला माहिती मिळाली आहे. त्यामुळे मी माझ्या मंत्रालयीन कार्यालयाला सांगतो की, गृह विभागाची काही माहिती आहे का, पोलीस महासंचालक कार्यालयाची काही माहिती आहे, याबाबत माहिती घेतो”, अशीदेखील प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नेमकं प्रकरण काय?
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. कारण या निवडणुकीवेळी महायुतीमधील मोठी धुसफूस उघडकीस आली होती. विशेष म्हणजे सातारा जिल्हा परिषदेत ज्या काही घडामोडी घडल्या त्यावरुन खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या भर सभागृहात नाराजी व्यक्त केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर आता साताऱ्याच्या एसपींना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणात विधान परिषदेत ज्या घडामोडी घडल्या त्या देखील तितक्याच इंटरेस्टिंग होत्या. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी साताऱ्याच्या एसपींसह तीन अधिकाऱ्यांवर निलंबन करण्याचे आदेश दिले. पण त्यानंतर मंत्री जयकुमार गोऱ्हे यांच्या मागणीनंतर तो निर्णय राखूनही ठेवण्यात आला होता.
सातारा जिल्हा परिषदेत 20 मार्च 2026 ला अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. खरंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागांवर यश मिळालं होतं. सातारा जिल्हा परिषदेसाठी 65 जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकलं नाही. इथे भाजपला 27, राष्ट्रवादी काँग्रेसला 20 आणि शिवसेना शिंदे गटाला 15 जागांवर यश मिळालं.
राज्यात या तीनही पक्षांचं सरकार असलं तरी स्थानिक पातळीवर या तीनही पक्षांमध्ये आलबेल नव्हतं. विशेष म्हणजे निवडणूक जाहीर झाल्यापासूनच इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी दोन्ही पक्षांनी आपल्या निवडून आलेल्या सदस्यांना टुरवर पाठवलं होतं.
निवडणुकीच्या वेळी दोन्ही पक्षांचे सदस्य साताऱ्यात आले होते. पण ऐनवेळी एका सदस्याच्या कथित अपरहणाच्या गुन्ह्यात राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यावेळी मोठा गोंधळ उडाला होता. विशेष म्हणजे यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची पोलिसांसोबत बाचाबाची आणि सौम्य धक्काबुक्की झाली होती. या संघर्षात त्यांच्या हाताला सौम्य दुखापत झाल्याचं देखील वृत्त समोर आलं होतं. याच मुद्द्यावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेत वातावरण तापलं होतं.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा