• Sun. Aug 16th, 2026
Mata Sanman 2026 | डॉ. कृष्णमेघ कुंटे यांचा वसुंधरा साथी सन्मान देऊन गौरव

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ध्येयासाठी धडपडत आभाळाएवढे यश मिळवणारे, झोकून देऊन काम करणाऱ्याचे कर्तृत्व आकाशाला गवसणी घालणारे असते. मात्र तरीही त्यांचे पाय जमिनीवरच असतात. याच ध्येयासाठी धडपणाऱ्या हातांप्रती कृतज्ञता व्यक्त करत ‘पीएनजी ज्वेलर्स प्रस्तुत ‘मटा सन्मान २०२६’ पॉवर्ड बाय सारस्वत बँक’ सोहळ्यामध्ये बटरफ्लाय मॅन ऑफ इंडिया बिरुदावली मिळालेल्या डॉ. कृष्णमेघ कुंटे यांचा महाराष्ट्र टाइम्स आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या तर्फे वसुंधरा साथी सन्मान देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यंदाच्या या विशेष पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed