• Fri. Jun 5th, 2026
    Pune Crime : नोकरी गेल्यानं नैराश्य, मुंबईच्या युवकाचं पुण्यात टोकाचं पाऊल; F.C रोडवर स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न

    Pune F.C Road News : शहरातील गजबजलेल्या एफ.सी. रोड परिसरात शनिवारी रात्री मोठी घटना घडली. खाऊगल्ली परिसरात एका व्यक्तीने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

    एफसी रोड युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : पुणे म्हणजे कायम गजबजलेलं शहर, पण या गजबजाटात कधी कधी मनाच्या आत चाललेलं वादळ कुणालाच दिसत नाही. असाच एक मोठा प्रकाराने काल शनिवारी रात्री एफसी रोडवरील खाऊगल्ली एक घटना घडली. काल शनिवारी रात्री सुमारे ९.१५च्या सुमारास सगळे नेहमीसारखे खाणं-पिणं एन्जॉय करत असताना अचानक एक गोंधळ उडाला. आदित्य सातपुते (वय ४१) नावाच्या इसमाने स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार इतका अचानक घडला की तिथे उपस्थित लोक काही क्षणांसाठी घाबरून गेले.

    नेमकी घटना काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य सातपुते हे मूळचे मुंबईतील बोरिवलीचे रहिवासी असून सध्या पुण्यातील भोसले नगरमध्ये राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांची नोकरी गेली होती आणि त्यानंतर ते प्रचंड मानसिक तणावात होते. याच नैराश्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. घटना घडताच आसपासच्या लोकांनी अजिबात वेळ न घालवता मदत केली. जखमी अवस्थेत असलेल्या आदित्य यांना लगेच जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
    Maharashtra TimesJalgaon News: हसत्या-खेळत्या संसाराचा डाव अर्ध्यावरच मोडला! पती-पत्नीने शेतात जाऊन मृत्यूला कवटाळलं, दोन लेकरांवर दु:खाचा डोंगर
    या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात नोकरी गेल्यामुळे आलेल्या मानसिक तणावातूनच हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र, यामागे अजून काही कारण आहे का? याचाही पोलीस सखोल तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे एफसी रोडसारख्या कायम गजबजलेल्या ठिकाणीही अशा घटना घडू शकतात, याची जाणीव पुन्हा एकदा सगळ्यांना झाली. बाहेरून सगळं ठीक दिसत असलं तरी प्रत्येकाच्या मनात काय सुरू आहे, हे समजणं किती गरजेचं आहे, हे या प्रकारातून समोर आलं.
    Maharashtra TimesSindhudurg Crime : प्रामाणिक अन् कर्तव्यनिष्ठ वाहक म्हणून ओळख, सगळ्यांच्या लाडक्या लाडोबाने स्वत:ला संपवलं; जंगलात आढळलं पार्थिव

    व्यावसायिक स्पर्धेला भयानक वळण

    एलपीजी सिलिंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांची भाववाढ करण्यावरून झालेल्या भांडणातून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्या तिघांनी उपाहारगृहचालकासह त्याच्या सहकाऱ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना शनिवारी दुपारी महर्षीनगर परिसरात घडली. या घटनेनंतर तिघे हल्लेखोर पसार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा