Worli-Sewri Double Decker Road: भूसंपादनाच्या समस्या आणि तिथेच पुनर्वसनाची मागणी करणाऱ्या रहिवाशांमुळे वरळी शिवडी उन्नत मार्ग प्रकल्पाला विलंब झाला होता. हा प्रश्न आता सुटल्याने, अधिकाऱ्यांना कामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मुंबईतील वरळी-शिवडी उन्नत मार्गाला चालना मिळत आहे. शुक्रवारी प्रभादेवी येथील लक्ष्मी निवास पाडण्यास सुरूवात झाली. या उन्नत प्रकल्पाच्या मार्गावर अनेक स्थानकांचे घरे, इमारती असल्यामुळे या प्रकल्पाला विलंब झाला आहे. पण लक्ष्मी निवासाच्या पाडकामासह पुनर्वसनातील एक प्रमुख अडथळा दूर झाला असून प्रकल्प मार्गी लागला आहे.
दोन इमारती पाडून उन्नत मार्ग
लक्ष्मी निवासामधील नागरिकांना यापूर्वीच स्थलांतरित करण्यात आले असल्यामुळे इमारत रिकामी करून ती पाडणे शक्य झाले. यानंतर प्रकल्पाच्या मार्गावर असलेली हाजी नूरानी इमारतही लवकरच रिकामी करून पाडकाम सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या इमारतीतील रहिवाशांना कोणत्याही भाड्याच्या तात्पुरत्या खोलीत स्थलांतरित करण्या ऐवजी त्यांना स्वतःचे हक्काचे घर देण्यात आले आहे.Prabhadevi Bridge: प्रभादेवीमध्ये उभारणार ‘डबल डेकर पूल’, 100 वर्ष जुन्या रेल्वे पुलाचं पाडकाम निम्म्यावर; शिवडी-वरळी कनेक्टर’ला वेग
वरळी-शिवडी उन्नत मार्गाचं काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून(MMRDA) सुरू आहे. त्यांना या रहिवाशांसाठी 90 कोटी खर्चून म्हाडाकडून घरे मिळवली आहेत. त्यामुळे या दोन्ही इमारतीमधील सुमारे 75 रहिवाशांना स्वतःचं घर मिळालं आहे. लक्ष्मी निवास पूर्णपणे रिकामी झाल्यानंतर तिथे पाडकाम सुरू केलं. परंतु, हाजी नूरानीमधील काही रहिवासी अद्याप बाहेर पडले नाहीत.
कसा असेल मार्ग?
हा उन्नत मार्ग दक्षिण मुंबईतील एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. अटल सेतूशी जोडणी असलेल्या या मार्गामुळे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. दरम्यान, या उन्नत मार्गासाठी प्रभादेवी येथे एक डबलडेक उड्डाणपूल उभारण्याचं काम सुरू आहे. यासाठी काही दिवसांपूर्वीच 100 वर्ष जुन्हा प्रभादेवी (एलफिन्सटन) उड्डाणपुलाचं पाडकाम सुरू झालं. या मार्गावर या दोन इमारती अडथळा ठरत होत्या. त्यामुळे येथील नागरिकांचं पुनर्वसन करून या इमारती पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.
Maharashtra Weather: राज्यात पुन्हा हवामान बदलणार! 30 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता
कधी पूर्ण होणार मार्ग?
पुनर्रचित एल्फिन्सटन पूल सेनापती बापट मार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाशी जोडणार आहे. या डबल डेकर उड्डाणपुलाचा एक भाग वांद्रे वरळी सी-लिंकला जोडणार आहे तर दुसरा भाग शिवडी येथे अटल सेतूला जोडे, जमिनीपासून 27 मीटर उंचीवर तयार होत असलेला हा पूल पूर्व द्रुतगती मार्ग, बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील उड्डाणपूल आणि दक्षिण मुंबईतील रेल्वे मार्गिकांवरून जाणार आहे. हा संपूर्ण कॉरिडोर सप्टेंबर 2026पर्यंत पूर्ण करण्याची एमएमआरडीएने मुदत दिली आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा