Pune Police Recruitment Youth Dies : पुण्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पोलीस भरतीवेळी एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं एकच हळहळ व्यक्त होत आहे.
पुणे शिवाजीनगर पोलीस भरती तरुणाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मैदानात उतरलेला एक तरुण धावताना अचानक कोसळला आणि काही क्षणांतच सगळं संपलं. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आज शनिवारी सकाळी अतिशय हृदयद्रावक आणि हळहळ व्यक्त करायला लावणारी घटना घडली. पुरुषोत्तम बारकुल (वय २३, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असं या मृत तरुणाचं नाव आहे.
नेमकी घटना काय?
पुणे शहरात गेल्या महिन्याभरापासून पोलीस भरतीची प्रक्रिया जोरात सुरू आहे. विविध टप्प्यांमधून उमेदवार जात असताना सध्या मैदानी चाचण्यांचा टप्पा सुरू आहे. शिवाजीनगरच्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर कारागृह पोलीस भरतीसाठी उमेदवारांची चाचणी घेतली जात होती. आज शनिवारी सकाळी वातावरणही थोडं तणावपूर्ण होतं. सगळे उमेदवार आपापल्या परीने चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करत होते. पुरुषोत्तमही त्याच जिद्दीने १६०० मीटर धावण्याच्या चाचणीत उतरला होता. ही चाचणी तशी कठीणच मानली जाते आणि अनेकांसाठी निर्णायकही ठरते. पुरुषोत्तमने दमदार सुरुवात करत एकामागून एक तीन फेऱ्या पूर्ण केल्या. मात्र, चौथ्या फेरीत धावत असताना अचानक त्याला अपस्माराचा झटका (फिट) आला. काही कळायच्या आत तो थेट मैदानावर कोसळला. हे पाहताच इतर उमेदवार घाबरले आणि त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना आवाज दिला. Jalgaon Crime : मित्रांना पिस्तुलची माहिती देताना आक्रित घडलं, मिसफायर झाल्याने छातीला गोळी लागली; तरुणाचा जागीच अंत
हृदयाचे ठोके मंदावले
घटनास्थळी उपस्थित असलेले अधिकारी आणि कर्मचारी लगेच धावून आले. मैदानावरच तैनात असलेल्या वैद्यकीय पथकाने त्याची प्राथमिक तपासणी केली. त्यावेळी त्याचे हृदयाचे ठोके मंदावल्याचं आढळलं, त्यामुळे परिस्थिती गंभीर असल्याचं स्पष्ट झालं. क्षणाचाही विलंब न लावता त्याला तातडीने ससून रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. ही बातमी समजताच भरती प्रक्रियेत उपस्थित असलेल्या सर्वांवर शोककळा पसरली. Dombivli Crime : पगार थकला अन् डम्पर चालक संतापला, मालकाच्या कारला फरफटत नेलं; थरारक Video समोर पुरुषोत्तम हा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील रहिवासी होता. पोलीस होण्याचं मोठं स्वप्न घेऊन तो या भरतीत सहभागी झाला होता आणि त्यासाठी त्याने मेहनतही घेतली होती. मात्र, नियतीने वेगळंच काहीतरी ठरवलं आणि त्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं. या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती अपर पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी दिली.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा