• Mon. Jun 15th, 2026
    Beed Accident : कीर्तनकार ह.भ.प. श्रीहरी महाराज पुरी यांच्या पत्नी आणि मुलाचा कार अपघात, माय-लेकाचा होरपळून मृत्यू

    बीडच्या आष्टी तालुक्यातील कापसी फाट्यावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव टिप्परच्या धडकेमुळे कारने पेट घेतल्याने ह.भ.प. श्रीहरी महाराज पुरी यांच्या पत्नी आणि मुलाचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला. कीर्तन सुरू असतानाच ही हृदयद्रावक घटना घडली.

    बीडमध्ये टिप्परच्या धडकेनंतर कार पेटली, माय-लेकाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुनील जाधव, बीड: रस्त्यावरील बेजबाबदार आणि भरधाव वेगाचा आणखी एक भीषण बळी समोर आला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एका भरधाव टिप्परने कारला दिलेल्या भीषण धडकेत कारने अचानक पेट घेतला. कारमध्ये लागलेली आग एवढी भीषण होती की, आत बसलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची साधी संधीही मिळाली नाही. परिणामी, गाडीमध्येच अडकून पडलेल्या माय-लेकाचा होरपळून जागीच दुर्दैवी अंत झाला. ही हृदयद्रावक घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कापसी फाट्यावर घडली आहे. या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींमध्ये ह.भ.प. श्रीहरी महाराज पुरी यांच्या पत्नी पुष्पा श्रीहरी पुरी (वय ४२ वर्षे) आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश श्रीहरी पुरी (वय २५ वर्षे) यांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण आष्टी तालुक्यावर आणि बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

    थरारक आणि दुर्दैवी अपघात

    मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, पुष्पा श्रीहरी पुरी आणि त्यांचा तरुण मुलगा ऋषिकेश पुरी हे दोघे आपल्या कारमधून आष्टीकडून बीडच्या दिशेने प्रवासाला निघाले होते. त्यांची कार कापसी फाट्याजवळ आली असता, समोरून येणाऱ्या एका अनियंत्रित आणि भरधाव टिप्परने (क्रमांक MH 16 CD 7305) त्यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिली.ही धडक इतकी भीषण होती की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि काही क्षणातच कारने पेट घेतला. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे माय-लेकाला कारचे दरवाजे उघडून बाहेर पडता आले नाही. बघता बघता दोघेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

    Maharashtra TimesPune Crime : घरातलं भांडण बाहेर आलं… आणि थेट ॲक्शन सीन; पुण्यात घरगुती वादाच्या भांडणात राडा झाला, जबर मारहाणीत तिघे गंभीर जखमी

    बचावकार्यात अडथळे

    घटनेची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक ग्रामस्थ, पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, कारचा झालेला चेंदामेंदा आणि लागलेली आग यामुळे मृतदेह बाहेर काढणे अत्यंत कठीण झाले होते. मृतदेह गाडीच्या पत्र्यांमध्ये आणि सीटमध्ये अडकले होते. अखेर प्रशासनाला आणि ग्रामस्थांना तब्बल दीड ते दोन तास शर्थीचे प्रयत्न करून कटरच्या सहाय्याने गाडीचे पत्रे कापून मृतदेह बाहेर काढावे लागले.

    वडील कीर्तनात मग्न असतानाच काळाचा घाला

    या अपघातातील अत्यंत वेदनादायी आणि डोळ्यात पाणी आणणारी गोष्ट म्हणजे, मयत ऋषिकेशचे वडील श्रीहरी पुरी हे आष्टी पंचायत समितीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत असून ते एक उत्तम कीर्तनकार देखील आहेत. ज्यावेळी त्यांच्या डोळ्यादेखत त्यांचा संसार आणि पोटचा तरुण मुलगा संपला, नेमक्या त्याच वेळी पुरी महाराज एका ठिकाणी हरीनामाच्या कीर्तनात मग्न होते.

    कीर्तनात हरिनामाचा गजर चालू असतानाच त्यांच्या कुटुंबावर हा दुःखाचा डोंगर कोसळल्याचे समजताच उपस्थित भाविक आणि नागरिकांचे डोळे पाणावले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जात असून, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जड वाहनांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा