Pimpri Chinchwad News : एका 22 वर्षीय अविवाहित तरुणीचे राहत्या घरीच बाळंतपण झाले. मात्र त्यानंतर उद्भवलेल्या गंभीर गुंतागुंतीमुळे आई आणि तिच्या अवघ्या एक दिवसाच्या बाळाचाही मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड तरुणीची घरीच प्रसूती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड : पिंपरी- चिंचवडमध्ये एक हृदयद्रावक आणि वेदनादायक घटना उघडकीस आली आहे. अविवाहित तरुणीने घरीच बाळाला जन्म दिल्यानंतर काही तासांतच आई आणि नवजात बाळ दोघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शहरातील चिंचवडे नगर, चिंचवड येथे राहणारी २२ वर्षीय तरुणी गरोदर असल्याची माहिती कुटुंबीयांपासून लपवण्यात आल्याचं समोर येत आहे.
घरातच झाले बाळंतपण
मंगळवारी २४ मार्च रोजी सकाळी अचानक तिची प्रकृती बिघडली आणि घरातच तिचे बाळंतपण झाले. मात्र योग्य वैद्यकीय मदत वेळेत न मिळाल्याने तिची तब्येत झपाट्याने खालावली. तात्काळ तिला आणि बाळाला रावेतमधील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर तरुणीची प्रकृती गंभीर असल्याचं लक्षात येताच तिला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. Kolhapur News : खेळताना अचानक लागलेली उचकी ठरली काळ, कोल्हापूरच्या चार वर्षीय बालिकेचा दुर्दैवी अंत
माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू
दरम्यान, नवजात बाळाची स्थितीही चिंताजनक बनली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाळाला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र उपचार सुरू असतानाच सायंकाळी बाळाचा मृत्यू झाला. आईवरही ससून रुग्णालयात उपचार सुरू होते, पण तिची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि सायंकाळी तिचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे वेळेवर उपचार न मिळाल्यास होणारे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत. चिंचवड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पुण्यात तरुणानं संपवलं जीवन
पती-पत्नीतील वाद आणि सासरकडून होत असलेल्या कथित मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने जीवन संपवण्यापूर्वी व्हिडिओ तयार करून मित्राला पाठवल्यानंतर विष प्राशन करून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना कात्रज परिसरात उघडकीस आली आहे. Ashok Kharat Case Update : शक्तिवर्धक औषधांमुळे बसलेला अर्धांगवायूचा झटका, खरातच्या HIV टेस्टचा निकालही समोर आला महंमद साद आसिफ सय्यद (वय २०, सध्या रा. जांभूळवाडी, कात्रज; मूळ रा. नयापुरा, मालेगाव, जि. नाशिक) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी करीमुन्निशा उर्फ निशाखान, सर्वर उर्फ कैफकमरुखान, रेश्मा कमरुखान, शमा जावेद शेख, जावेद शेख, अथर्व काळे आणि इशिता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा