• Sat. Jun 6th, 2026
    खेळताना अचानक लागलेली उचकी ठरली काळ, कोल्हापूरच्या चार वर्षीय बालिकेचा दुर्दैवी अंत

    Kolhapur Girl dies of Hiccups : दुपारी अनन्या भावंडांसोबत खेळत असताना अचानक उचकी लागून ती बेशुद्ध पडली. तिला तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केलं, परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    कोल्हापूर : लहान मुलांच्या बाबतीत कधी कोणती अघटित घटना घडेल सांगता येत नाही. अशाच पद्धतीने कोल्हापुरात एका बालिकेला खेळता खेळताच एका छोट्याशा गोष्टीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथे ही घटना घडली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या बंडरोळी कुटुंबात चार वर्षीय अनन्या प्रकाश बंडरोळीचा दुःखद अंत झाला आहे. घरात खेळताना अचानक तिला उचकी लागून ती बेशुद्ध झाली होती. ही घटना गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत करण्यात आली आहे.

    नेमकं काय झालं?

    सीपीआर पोलिस चौकीतून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, प्रकाश बंडरोळी हे मूळचे कर्नाटकातील रहिवासी असून, बांधकामासाठी ट्रॅक्टर-ट्रॉली पुरवतात. त्यांच्या पत्नीसह अनन्या आणि भावाची मुले त्यांच्या घरी होते. गुरुवारी सकाळी प्रकाश बंडरोळी कामासाठी गेले होते. दुपारी अनन्या भावंडांसोबत खेळत असताना अचानक तिला उचकी लागून ती बेशुद्ध पडली. त्यामुळे तिला तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून शवविच्छेदनासाठी पार्थिव पाठवले आहे. अहवाल मिळाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.
    Maharashtra TimesAshok Kharat : माझ्या अंतर्मनाने धोका दिला, ज्यांचं भलं केलं तेच उलटले, अशोक खरातची बडबड, पोलीस कोठडीतही मंत्रजप

    वैद्यकीय तज्ज्ञांचे काय मत?

    सीपीआर रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. कुंभोजकर यांनी सांगितले की “लहान मुलांमध्ये अशी अचानक उचकी लागण्यामागे खाण्याचा घटक, खेळण्याचा छोटा तुकडा किंवा इतर काहीही फॉरेन बॉडी श्वासनलिकेत अडकली असण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान मुलांना आपल्या गैरहजरीत काहीही खायला किंवा तोंडात जाईल अशी गोष्ट खेळायला देऊ नये, अन्यथा ती गोष्ट बाळाच्या जीवावर बेतू शकते. अनन्याबाबत अंतिम शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कारण समजू शकेल.”
    Maharashtra TimesLockdown Rumors : भारतात लॉकडाऊन लागणार नाही! पेट्रोलियम मंत्र्यांचं स्पष्टीकरण; इंधनदराबाबात मोदींपुढचे दोन पर्यायही सांगितले
    दरम्यान अनन्याला पूर्वी कोणताही आजार नव्हता. ती अत्यंत ठणठणीत आणि निरोगी असल्याचे कुटुंबीय सांगतात. मात्र कुटुंबावर अचानकपणे ओढवलेल्या या दुर्घटनेमुळे कुटुंब, नातेवाईक हळहळ व्यक्त करत आहेत. तर परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा