• Thu. Jun 18th, 2026
    Ashok Kharat : 90 लाखांची मर्सिडीज कार ते दुसऱ्याच्या पैशांवर अनेक देश फिरला, खरातने व्यावसायिकाला काळी जादूच्या भीतीने कोट्यवधीने लुटलं

    अशोक खरात याचे नवनवीन कारनामे समोर येत आहे. त्याने काळी जादूच्या आणि जीवे मारण्याच्या भीतीने केवळ महिलांना छळलं नाही तर त्याने मोठमोठ्या व्यवसायिकांनाही छळल्याचं आता समोर येत आहे. एक पीडित व्यवसायिक आता स्वत:हून तक्रारीसाठी समोर आला आहे. संबंधित व्यवसायिकाने खरातने आपल्याला कशा पद्धतीने कोट्यवधीने लुटलं? याबाबत सविस्तर तक्रारीत मांडलं आहे. ही माहिती ऐकून पोलीसही चक्रावले असण्याची शक्यता आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : अशोक खरात याच्यावर आता आठवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका बांधकाम व्यावसायिक असलेल्या तक्रारदाराने पोलिसांत आपली तक्रार नोंद केली आहे. त्यानुसार पोलिसांत आता भोंदू खरात याच्या विरोधात आठवा गुन्हा दाखल झाला आहे. बांधकाम व्यावसायिक असलेल्या एका इसमाला लॉजिस्टिक या व्यवसायाची परदेशात व्याप्ती वाढवायची होती. याच दरम्यान त्यांना त्यांच्या एका परिचयाच्या व्यक्तीकडून अशोक खरात उर्फ कॅप्टन याच्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अशोक खरात याची नाशिकच्या ओकस प्रॉपर्टी अँड डेव्हलपर या कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी खरात याने त्यांना आपल्याकडे ‘दैवी शक्ती’ असल्याचे भासवून आणि त्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू करण्यासाठी त्याआधी ‘अवतार पूजा’ करावी लागेल असे सांगितले.

    अशोक खरात एवढ्यावरच थांबली नाही. त्याने व्यवसायिकाला मरणाची भीती घालून आपल्या जाळ्यात अडकवले. एवढेच नव्हे तर या बाबाने पीडित इसमाकडून जवळपास 90 लाख रुपये किंमत असलेली एक मर्सिडीज कार देखील खरेदी करून घेतली होती. विशेष बाब म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यातून खरेदी केलेली कार हा बाबा स्वतः चालवत नाशिक येथे घेऊन आला होता.

    अवतार पूजेच्या नावाने लुटलं

    अशोक खरात त्याने पुन्हा ‘अवतार पूजेच्या’ नावाखाली पीडित इसमाला गंडा घालने सुरूच ठेवले. अवतार पूजेवेळी खरात याने रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात हात चलाखी करून एक खोटा साप दाखवला होता आणि परिसराची प्राप्ती करून घेण्यासाठी 21 देशांत भ्रमण करावे लागेल, येत्या 5 वर्षात तुला आणि मला 21 देशात घेऊन जाऊन तेथील मातीला स्पर्श करून त्या मातीची पूजा करावी लागेल. त्यानंतर तुझ्या व्यवसायाची भरभराट होऊन परिसराची प्राप्ती होईल, असे सांगण्यात आले होते. असे न केल्यास नागदेवतेचा कोप होऊन तुला नागदेवता तुला दंश करेन आणि तुझा मृत्यू होईल, अशी भीती घालण्यात आली.

    खरात अनेक देश व्यवसायिकाच्या खर्चाने फिरला

    अशोक खरातने पीडित व्यवसायिकाला सांगितले की, पृथ्वीवरील ज्या देशात मी सांगेन त्या देशात तुला मला घेऊन जावे लागेल. मला दिलेले वचन जर तू पाळले नाही तर मी काळी जादू करून तुला मारून टाकेन, अशी भीती त्याने घातली. त्यानंतर २०१८ साली म्यानमार, २०१९ साली ग्रीनलँड येथे नेले. एवढेच नाही तर मानससरोवर हे स्वर्गाचे एक टोक मानले जाते तर ग्रीनलँड याला स्वर्गाचे दुसरे टोक मानले जात असल्याचे सांगून फर्चीवर झोपून मी आता स्वर्गात जाणार असून मला तसे संकेत मिळत असल्याचे सांगितले होते.

    मारण्याची भीती घालून पीडित व्यक्तीला लुटलं

    त्यानंतर पुन्हा मारणाची भीती घालून पीडित इसमाकडून खरात याने नवीन वास्तूसाठी तुर्कस्थान येथील लाकडी आणि लोखंडी बांधकाम करून घेतले ज्यासाठी करोडो रुपये भोंदू खरात याने त्याच्या खात्यावर वळवून घेतले होते. त्याने आपली काळे कूकृत्य सुरू ठेवून खरात २०१९ ते २०२३ या कालावधीत युगांडा, इजिप्त, आयर्लंड, श्रीलंका, कंबोडिया, बांगलादेश येथे पूजा केली आणि या सर्व देशातील प्रवासाचा खर्च देखील खरात याने पीडित यांच्याकडून करून घेतला. अमेरिकेत देखील स्वतःवर लाखो रुपयांचा उपचार खरात याने पीडित व्यवसायिकाकडून करून घेतला होता.

    खरातने पीडित व्यवसायिकावर दाखल केला गुन्हा

    अखेर खरात याच्यावर संशय बळावल्याने पीडित व्यवसायिकाने त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. त्यानंतर खरात हा भक्त येण्याआधी नकली साप आणून त्यावर काळ्या रंगाची पन्नी बांधून तो खरा साप असल्याचे भासवून लोकांकडून पैसे उकळत होता. त्यांनंतर पीडित व्यक्तीने खरात याच्याकडे काही वर्षांपासून केलेला खर्च आणि घेऊन दिलेली मर्सिडीज कार अशी सर्व रक्कम मागितली असता या भोंदूने पीडित व्यवसायिकावरच गुन्हा दाखल केला होता.

    आता अशोक खरात याचा खरा चेहरा जागासमोर आल्यानंतर आणि खरात याच्यावर झालेली कारवाई समोर येताच पीडित व्यवसायिकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आता खरात विरोधात आठवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या दिशेने देखील आता तपास सुरू केला जाणार आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा