पुण्यातील बिबवेवाडी परिसरात चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : संशयाचं भूत कोणत्या टोकापर्यंत जाऊ शकतं याचं प्रत्यक्ष उदाहरण पुण्यामध्ये घडलंय. चरित्र्यावरील संशयावरून पतीने आपल्या पत्नीला एवढी जबर मारहाण केली की पत्नीला तिचा जीव गमवावा लागला आहे. ही धक्कादायक घटना घडली आहे शहरातील अप्पर इंदिरानगर परिसरात. २४ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास घडलेली घटना ऐकून पुणेकर हादरले आहेत. पतीने चारित्र्यावर संशय घेत आपल्या पत्नीला मारहाण केली, ज्यात पत्नी गंभीर जखमी झाली आणि उपचार सुरु असताना गुरुवारी पहाटे तिचा मृत्यू झाला आहे.
पतीला अटक
घटनेत ठार झालेली २३ वर्षीय सारीका शुभम घोडके ही महिलेची ओळख आहे. आरोपी पती, २९ वर्षीय शुभम श्रीकांत घोडके, हा पानटपरी चालवतो. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, खुनाचा प्रयत्न आणि खुनाचे कलम दोन्ही गुन्हे दाखल केले आहेत.
मृत महिलेच्या आईने दिली फिर्याद
सारिकाची आई, ५० वर्षीय गेणीबाई रुपसिंग चव्हाण यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यांनी सांगितले की, शुभम नेहमीच सारिकाच्या चारित्र्यावर संशय करत असे आणि घरात तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. २४ मार्च रोजी तो घरी आला आणि तीक्ष्ण हत्याराने तिच्या डोक्यात, हातावर आणि पायावर वार करून गंभीर जखमी केले. शेजाऱ्यांच्या मदतीने तिला तातडीने रुग्णालयात नेले, परंतु उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला.
Narhari Zirwal: विकेट पाडण्याचा खेळ, झिरवाळांचं मंत्रिपद घालवण्यासाठी माजी मंत्र्याचा सहभाग; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते तपास करत आहेत. त्यांनी घटनास्थळी साक्षीदारांची छाननी सुरु केली असून, आरोपीच्या मानसिक स्थितीबाबत आणि घटना घडण्याच्या परिस्थितीबाबत सखोल तपास सुरु आहे.
कौटुंबिक माहिती
सारिका आणि शुभम यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून शेजारी हादरले आहेत. महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होतं आहे. या घटनेमुळे कौटुंबिक हिंसेवर आणि वैवाहिक संशयावर शहरात चर्चा रंगली आहे. घरातील वाद आणि संशयावर संयम ठेवणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
स्थानिक रहिवाशांनी महिलांच्या सुरक्षेसाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक दृष्टिकोनातूनही हा प्रकार धडा देणारा आहे. घरात हिंसेला कोणतीही जागा नाही, आणि प्रत्येक पती-पत्नीने संयम आणि संवाद राखणे आवश्यक आहे.
बिबवेवाडीतील ही घटना केवळ परिसरातच नव्हे, तर संपूर्ण पुण्यात थरारक चर्चा बनली आहे. चारित्र्यावर संशय, वैवाहिक वाद, आणि एका महिलेचा अनपेक्षित मृत्यू या घटनेने शहरभर थरारक वातावरण निर्माण केले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.
मेन डेस्क इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.
फोटोगॅलरी, वेबस्टोरी तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.
शिक्षण सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.
जाहिरात क्षेत्रात काम याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.
दिग्दर्शन, संगीत कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा