Nashik Women Assault Case : भोंदूगिरीच्या आडून महिलांवर अत्याचार करणाऱ्या संशयित खरातची जीवन कहाणीदेखील तितकीच संशयास्पद असून १९६५च्या दरम्यान जन्म झालेल्या खरातने त्याच्या वयाच्या सतराव्या वर्षी नातलगांपैकी एका तरुणीसोबत गैरकृत्य केल्याची गोपनीय माहिती पोलिसांकडे आहे
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक : लैंगिक अत्याचारांचे सात गुन्हे नोंद असलेला संशयित अशोक खरात उर्फ कॅप्टन याने भोंदूगिरीच्या व्यवसायात येण्यापूर्वी किंबहुना वयाच्या सतराव्या वर्षीच एका तरुणीसोबत गैरकृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. तेव्हापासून घरातून ‘करिअर’च्या नावाने गायब झालेल्या खरातने पश्चिम बंगालमध्ये भोंदूगिरीचे धडे गिरवून त्यातूनच अनेकांना गंडा घातला आहे. विशेष म्हणजे, खरात हा ‘मर्चन्ट नेव्ही’मध्ये कॅप्टन नव्हे, तर जहाजावर सफाई कामगार म्हणजेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी होता, अशी माहिती पोलिस दलातील खात्रीलायक सूत्रांनी दिली.
जीवन कहाणीही संशयास्पद
भोंदूगिरीच्या आडून महिलांवर अत्याचार करणाऱ्या संशयित खरातची जीवन कहाणीदेखील तितकीच संशयास्पद आहे. सन १९६५च्या दरम्यान जन्म झालेल्या खरातने त्याच्या वयाच्या सतराव्या वर्षी नातलगांपैकी एका तरुणीसोबत गैरकृत्य केल्याची गोपनीय माहिती पोलिसांकडे आहे. अर्थात, त्याप्रकरणी कोणतीही कायदेशीर फिर्याद तेव्हा आणि आता दाखल नाही. परंतु, त्याच्या तेव्हाच्या कुकर्मानंतर नोकरीच्या नावाखाली खरात घरातून गायब झाला. अचानक त्याने ‘मर्चन्ट नेव्ही’त काम करीत असल्याचे सांगत थेट ‘कॅप्टन’ असल्याची पुडी सोडली. त्यामुळे काही दिवसांतच नातलगांसह ग्रामस्थ व नागरिकांमध्ये तो ‘कॅप्टन’ नावाने प्रचलित झाला. जहाजावर सफाई कामगार असलेल्या खरातने बँकॉकसह इतर देशात काम केले. तेथेही अय्याशी करणाऱ्या खरातने काही वर्षांनी पश्चिम बंगालमध्ये वास्तव्य सुरू केले. जहाजांवर कामे करून बंगालमध्ये वास्तव्य करताना त्याने तेथील गुरूंकडून भोंदूगिरीचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. ठोकताळे आणि काही मुद्द्यांद्वारे नागरिकांना गंडवून पूजाविधी, भविष्याच्या नावाखाली ‘उद्योग’ थाटण्याचा निर्णय घेतला.
सन १९९७-९८मध्ये नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात कार्यालय सुरू करीत त्याने भोंदूगिरीला सुरुवात केली. गंभीर बाब म्हणजे, संशयिताने कुकर्म करताना महाविद्यालयीन विद्यार्थिनींसोबतही गैरकृत्ये केली आहेत. शैक्षणिक सल्ला, करिअरच्या नावे पूजा व इतर गोष्टी सांगत त्याने अंगलट आणि अत्याचार केल्याचे दाखल गुन्ह्यांवरून स्पष्ट होत आहे. यासह खरातवर अंधविश्वास ठेवत पीडितांच्या नातलगांसह आप्तेष्टांनीच त्यांना खरातच्या जाळ्यात पोहोचविल्याचेही पोलिस तपासात समोर येत आहे.
‘स्पाय कॅमेरा’ महत्त्वपूर्ण
संशयित खरातने त्याच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या पत्नीसोबतच अत्याचार केल्याने ‘त्या’ कर्मचाऱ्याने मित्राच्या मदतीने खरातच्या कार्यालयात ‘स्पाय कॅमेरा’ बसवला. त्यामुळे गत काही वर्षांतील खरातच्या कुकर्मांची ‘व्हिडीओ फाइल’ तयार झाली. ‘त्या’ कर्मचाऱ्याने बऱ्यापैकी हे प्रकरण उघड करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, राजकीय व प्रशासकीय शक्तींमुळे त्याचा प्रयत्न यशस्वी होत नव्हता. अखेर मुख्यमंत्री कार्यालयातून सूत्रे फिरली आणि नाशिक पोलिसांनी खरातला बेड्या ठोकल्या. तेव्हाही ‘स्पाय कॅमेरा’तील डेटानुसार तयार झालेला ‘पेन ड्राइव्ह’ या सर्व गुन्ह्यांमागील मुख्य पुरावा ठरला आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा