Mumbai News: राजधानी मुंबई, ठाणे वरायगड या जिल्ह्यांसाठी आज तुरळक ठिकाणी उष्ण वातावरणाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबईत उष्णतेची लाट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील कमाल तापमानाचा पारा बुधवारी ३५ अंश सेल्सिअसच्या खाली आला, तरी झळांची जाणीव मात्र कायम होती. महामुंबई परिसरात ही स्थिती आणखी दोन दिवस कायम राहील, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.
सांताक्रूझ येथे बुधवारी ३४.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. तर कुलाबा येथे ३२.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. दोन्ही केंद्रांवर २४ तासांमध्ये पारा १.५ अंशांनी खाली उतरला. मात्र बुधवारीही तापलेल्या वातावरणाची जाणीव मुंबईत कायम होती. कुलाबा येथे २५ तर सांताक्रूझ येथे २४.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची बुधवारी नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे १.४ आणि २.४ अंशांनी अधिक होते.
आज, गुरुवारी मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांसाठी तुरळक ठिकाणी उष्ण वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात शुक्रवारीही तुरळक ठिकाणी हे वातावरण कायम असेल, अशी शक्यता आहे.
प्रदूषणामुळे धुक्याला बळ
हिवाळ्यात उत्तर भारतात अनेक भागांत दाट धुके पसरते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होते, वाहतुकीला फटका बसतो. दिल्लीसारख्या शहरांमध्ये अनेकदा दिवसभर धुक्याची चादर कायम राहते. मात्र केवळ थंडी किंवा हवामानबदल यांमुळेच नव्हे, तर प्रदूषणामुळेही अधिक प्रमाणात धुके तयार होते, असे महत्त्वपूर्ण संशोधन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चेन्नई यांनी मांडले आहे.
सामान्यत: हिवाळ्यात रात्री वारा मंद किंवा अनुपस्थित असेल, तर वाहने, कारखाने आणि धुळीतून निघणारे सूक्ष्म प्रदूषक कण जमिनीजवळच साचून राहतात. तापमान खाली उतरले की, हवेतील आर्द्रता या कणांना चिकटते आणि तिचे रूपांतर पाण्याच्या अत्यंत सूक्ष्म थेंबांमध्ये (अवघ्या काही मायक्रोमीटर आकाराच्या) होते. या थेंबांची संख्या अधिक असते, तेव्हा ते प्रकाश अडवतात आणि दाट धुके तयार होते. सामान्यत: धुके तयार होण्यासाठी प्रत्येक घनमीटरमध्ये एक ते ५० दशलक्ष थेंब आवश्यक असतात.
या थेंबांची निर्मिती होताना, सुप्त उष्णता मुक्त होते. ती धुक्याला वरच्या दिशेने, अगदी ६०० ते ८०० मीटर उंचीपर्यंत पसरण्यास मदत करते. त्यापुढील सकाळी या दाट धुक्याचा थरच जमा होतो. त्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही, जमीन तापत नाही, परिणामी धुकेही लवकर विरत नाही. संशोधकांच्या मते, एखाद्या दिवशी धुके अधिक काळ टिकून राहिले, तर पुढच्या रात्रीही जमीन थंड राहून पुन्हा धुके तयार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. म्हणजेच, प्रदूषण आणि धुके यांचे चक्र सुरू राहते. धुक्याच्या वाढत्या समस्येचे मुख्य कारण हवामान बदल आहे, असे मानले जात होते. परंतु स्थानिक पातळीवरील प्रदूषणही यामध्ये तितकीच मोठी भूमिका बजावते, हे या संशोधनाने मांडले आहे. सायन्स ॲडव्हान्सेस आणि जिओफिजिकल रिसर्च लेटर्स या संशोधनपत्रिकांमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. वायू प्रदूषण कमी केल्यास हिवाळ्यातील धुक्याची समस्याही मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. नव्या आकलनामुळे हवामानाचा अंदाज अधिक चांगल्या प्रकारे वर्तवणे शक्य होणार आहे. त्यामुळे विमान वाहतूक तसेच अन्य वाहतूक सेवांचे व्यवस्थापन अधिक सुरक्षितपणे करणे शक्य होईल.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा