Chhatrapati Sambhajinagar Garage Fire : दुचाकी गॅरेजला लागलेल्या भीषण आगीच्या ज्वाळांमधून मुस्लिम बांधवांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता भगवान शंकराची मूर्ती सुरक्षित बाहेर काढली
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : एकीकडे धर्माच्या नावावर वाद होत असताना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन येथे माणुसकी आणि जातीय सलोख्याचे एक हृदयस्पर्शी उदाहरण पाहायला मिळाले. एका दुचाकी गॅरेजला लागलेल्या भीषण आगीच्या ज्वाळांमधून मुस्लिम बांधवांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता भगवान शंकराची मूर्ती सुरक्षित बाहेर काढली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या तरुणांच्या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हिंदू-मुस्लीम एकीच्या दर्शनाने नेटिझन्सही सुखावले आहेत.
नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन परिसरातील मुख्य रस्त्यावर संतोष काळे यांचे पूजा ऑटो पार्ट नावाचे दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास या गॅरेजला अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे गॅरेजमधील ऑईल, टायर आणि इतर महागडे सुटे भाग जळून खाक होऊ लागले. Ashok Kharat : खरातच्या केबिनमध्ये महिला शिरताच झुंबर बंद, कर्मचाऱ्यांसाठी नो एन्ट्रीचा ‘कोडवर्ड’, थक्क करणारे कारनामे
महादेवाची मूर्ती श्रद्धेने बाहेर काढली
आगीचे लोट लांबूनच दिसत होते. पहाटेची नमाज अदा करून मशिदीतून बाहेर पडलेल्या मुस्लिम तरुणांनी आगीचे लोट पाहिले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हे तरुण क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने दुकानाचे शटर उचकटले आणि आत अडकलेले साहित्य बाहेर काढण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, आगीच्या विळख्यात असलेल्या भगवान शंकराची मूर्ती या तरुणांनी मोठ्या श्रद्धेने आणि सुरक्षितपणे बाहेर काढली. Crime News : प्रेयसीसाठी बायकोचा काटा काढला, कार पेटवून अपघात भासवला, पण CNG टँकमुळे पोलखोल, डॉक्टर नवरा जाळ्यात
अन् मोठा अनर्थ टळला….
हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन केलेल्या या प्रयत्नांमुळे आग आजूबाजूच्या दुकानांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आगीत संतोष काळे यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असले, तरी या मुस्लिम तरुणांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. संकटाच्या वेळी धावून येणारा हाच खरा माणुसकीचा धर्म, अशी भावना परिसरात व्यक्त केली जात आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा