कोल्हापुरात इंधनाचा पुरवठा कमी असल्याच्या अफवांना पेव फुटला होता. त्यामुळे पेट्रोल पंपांवर गर्दी निर्माण झाली. यामुळे इंधनाच्या पुरवठ्यात असमतोल निर्माण झाला. या परिस्थितीला पूर्ववत करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचे आदेश काढले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवांनी निर्माण झालेल्या गोंधळावर आणि पेट्रोल पंपावर सुरू असलेल्या आवश्यकतेपेक्षा जास्तीच्या खरेदीवर प्रशासनाने अखेर कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील इंधनपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काही तात्पुरते निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले, तरी समाजमाध्यमांवरील संदेश आणि पंपांवरील गर्दीमुळे मागणी-पुरवठ्यात तात्पुरता असमतोल निर्माण झाला होता. त्यामुळे येत्या 31 मार्चपर्यंत हे नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधाच्या अंतर्गत आवश्यकतेपेक्षा जास्त अतिरिक्त इंधन खरेदी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. काही ठिकाणी “इंधन संपले” असे फलक लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि अनेकांनी लागोलाग पेट्रोल-डिझेल जास्त प्रमाणात खरेदी करून साठवून ठेवण्यासाठी प्रयत्न केला. परिणामी, पंप चालकांवर ताण वाढला आणि काही ठिकाणी इंधन वितरण मंदावल्याची बाब समोर आले.
किती रुपयांपर्यंत मिळणार पेट्रोल डिझेल?
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 आणि जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत अधिकारांचा वापर करून इंधनविक्रीवर मर्यादा घातल्या आहेत. या निर्णयानुसार दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंत, तर तीनचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी 2,000 रुपयांपर्यंतच इंधन देता येणार आहे. तर कॅन, बाटल्या, ड्रम यांसारख्या कशामध्येही इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. अशा पद्धतीने इंधन विक्री झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.
अत्यावश्यक सेवांना प्राधान्य
रुग्णवाहिका, आपत्कालीन सेवा, शासकीय यंत्रणा आणि इतर अत्यावश्यक वाहनांना इंधन पुरवठ्यात प्राधान्य देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच, प्रत्येक पेट्रोल पंपाने उपलब्ध साठा, प्राप्त साठा आणि मागणी केलेला साठा दर्शनी फलकावर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्ह्यात मुबलक इंधनपुरवठा
प्रशासनाच्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यात इंधनाचा बफर साठा पुरेसा आहे आणि पुरवठा देखील सुरळीत सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख कंपन्यांनीही आवश्यकतेनुसार इंधनाचा पुरवठा होत असल्याची हमी दिली आहे. मात्र येत्या कालावधीत पेट्रोल मिळणार नाही, पेट्रोल-डिझेल संदर्भात पसरलेल्या अफवांमुळे पॅनिक बाईंग झाले. त्यामुळे काही पंपांवर 25 ते 30 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त विक्री झाली, ज्यामुळे इंधन विक्री व्यवस्थेवर ताण आला.
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. इंधन ही तातडीची गरज असली तरी गरजेपेक्षा जास्त साठा करून ठेवण्याची मानसिकता टाळली नाही, तर कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ शकतो, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाचा सध्याचा आदेश 25 मार्च 2026 पासून लागू झाला असून 31 मार्च 2026 पर्यंत लागू राहणार आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा