• Sun. Jun 7th, 2026

    Eknath Shinde: फडणवीस उपस्थित, पण शिंदेंना जाणीवपूर्वक डावललं? महायुतीतील बेबनाव उघड, सरकारी कार्यक्रमात काय घडलं?

    Eknath Shinde: फडणवीस उपस्थित, पण शिंदेंना जाणीवपूर्वक डावललं? महायुतीतील बेबनाव उघड, सरकारी कार्यक्रमात काय घडलं?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. मात्र ठाण्याचे पालकमंत्री असलेले; तसेच ‘सिडको’ ज्यांच्या अख्यत्यारित येते त्या नगरविकास खात्याचे मंत्री असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या महत्त्वाच्या सोहळ्याला उपस्थित नसल्याने तर्कवितर्कांना उधाण आले.

    या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह वनमंत्री गणेश नाईक, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आदी उपस्थित होते. मात्र, शिंदे यांच्या अनुपस्थितीची चर्चा उपस्थितांमध्येही रंगली होती.

    या संदर्भात अधिक माहिती घेतली असता, एकनाथ शिंदे यांना या सोहळ्याचे आमंत्रण नसल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. कार्यक्रमाचे आयोजन केलेल्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिवपुतळ्याच्या अनावरणाबाबत शिंदे यांच्या कार्यालयाला काही थांगपत्ताच लागू दिले नसल्याचेही कळते. त्यामुळे एवढ्या महत्त्वाच्या सोहळ्यात शिंदे यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याची चर्चा रंगली असून, भाजप व शिवसेना यांच्यातील बेबनाव चव्हाट्यावर आल्याकडे लक्ष वेधले जात आहे. याबाबत शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. मात्र, त्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण नव्हते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली.

    शिवराज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर शनिवारी इतिहास, परंपरा आणि शिवभक्तीचा भव्य संगम घडला. संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे भोसले, जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यासाठी राज्यासह देशभरातून लाखो शिवप्रेमींनी हजेरी लावली. रायगड परिसर शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमून गेला.

    सकाळी नगारखान्यात शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राजसदर येथे शाहिरी कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते उत्सवमूर्तीचा अभिषेक; तसेच सिंहासनारूढ मूर्तीस सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात आला. या वेळी पोलिस दलाने मानवंदना दिली. जगदीश्वर मंदिरात वारकरी संप्रदायाला पंढरपूर वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान करण्यात आला. दुपारी पोवाडे, शिवचरित्रावरील व्याख्याने आणि लोककलांचे सादरीकरण झाले. जिल्हा प्रशासनाने मोफत बससेवा, आरोग्य सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था केली होती.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed