Mumbai Local Accident: मुंबई लोकलचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी स्वयंचलित बंद दरवाजांच्या लोकल आणि १५ डब्यांचा विस्तार करण्याच्या घोषणा केल्या गेल्या होत्या. पण मुंब्रा येथील घटनेला आता एक वर्ष उलटून गेला आहे आणि कोणताही बदल दिसून येत नाही आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महेश चेमटे, मुंबई: मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर प्रवासी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत रेल्वे प्रशासनाने विनावातानुकूलित स्वयंचलित दरवाजांची लोकल, १५ डबा विस्तार आणि गर्दी व्यवस्थापनाच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, दुर्घटनेला १२ महिने पूर्ण होत आले तरी यापैकी एकाही घोषणेची अमंलबजावणी झालेली नाही. गर्दी विभागण्याच्या उपाययोजना अद्याप कागदावरच असल्याने रेल्वे प्रवाशांना जीव धोक्यात घालून लोकलच्या पायदानावरच प्रवास करावा लागत आहे.
मुंब्रा दुर्घटनेला एक वर्ष
९ जून २०२५ रोजी दिवा आणि मुंब्रा स्थानक परिसरात झालेल्या लोकल दुर्घटनेत पाच प्रवाशांना जीव गमवावा लागला तर १३ जण जखमी झाले. दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या आदेशानूसार मुंबई उपनगरी रेल्वेसाठी विनावातानुकूलित स्वयंचलित दरवाजांच्या लोकलची घोषणा करण्यात आली. ही लोकल नव्या वर्षात रुळांवर येईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र, निम्मे वर्ष झाले तरी ही लोकल दृष्टिपथात आलेली नाही.
आणखी दोन महिने प्रतीक्षा मध्य रेल्वेच्या ताफ्यात दोन विनावातानुकूलित स्वयंचलित दरवाजे उघड-बंद होणारी लोकल दाखल झाली आहे. परंतु जागेच्या अडचणीमुळे या लोकलच्या चाचण्या खजुराहो-महोबा मार्गावर घेतल्या जात आहेत. आणखी दोन महिने या चाचण्या सुरू राहणार आहे. त्यानंतरच मुंबईत प्रवासी सेवेसाठी चालवण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
फलाट विस्ताराचे काम संथ गतीने
फलाट विस्तार जुलैअखेरीस पूर्णगर्दी कमी करण्यासाठी १५ डबा लोकल विस्तार प्रकल्पही संथ गतीनेच सुरू आहे. यासाठी ३४ स्थानकांवरील फलाट विस्ताराचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी ३० स्थानकांचे काम जुलैअखेर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह उर्वरित महत्त्वाच्या स्थानकांवरील कामे पूर्ण होण्यासाठी किमान डिसेंबर उजाडण्याची शक्यता आहे. यामुळे वाढत्या प्रवासी गर्दीवर तातडीचा उपाय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या १५ डबा लोकलची प्रतीक्षा आणखी लांबली आहे.
Mumbai Metro: महामुंबईत 14 मार्गांवर 300 किमी लांब ‘मेट्रो नेटवर्क’ उभारणार; वर्षाअखेरीस 120 किमीचा टप्पा होणार पार
वातानुकूलित लोकलची संख्या वाढली दुसरीकडे एसी लोकलच्या संख्येत मात्र मोठी वाढ झाली आहे. मुंब्रा दुर्घटनेच्या वेळी दररोज ६६ एसी लोकल धावत होत्या. आता हा आकडा १०८ वर पोहोचला असून हार्बर मार्गावरही एसी लोकलची सेवा सुरू झाली आहे. मात्र, या वाढीचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांना झालेला नाही. एसी लोकलचे तिकीट दर, विलंब आणि रद्द होणे अशा तक्रारींमुळे मोठ्या प्रमाणात सामान्य प्रवाशांची एसी लोकलकडे पाठ आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा