Navi Mumbai News: नवी मुंबईमधील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महासभेत काही महत्त्वांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. नवी मुंबई विमानतळ, अटल सेतू आणि नव्या ऐरोली पुलामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे.
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: नवी मुंबईतील ठाणे ते बेलापूर मार्गावरील प्रवास सिग्नलमुक्त करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प मंजूर झाला आहे. या मार्गावर रबाळे, पावणे, तुर्भे येथे उड्डाणपूल तसेच पामबीच मार्गावरील ‘एंड ऑफ जंक्शन’ अर्थात महापालिका मुख्यालयाजवळ दुहेरी भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. सोमवारी झालेल्या महासभेत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे प्रकल्प मार्गी लागल्यास वाहतूककोंडीतून प्रवाशांची सुटका होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पालिकेचे सभागृह नेते सागर नाईक यांनी महासभेत ३०:७० टक्के खर्चाच्या टप्प्यातील प्रस्ताव, तसेच पुलांच्या कामासाठी तांत्रिक सल्लागार नियुक्त करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर चर्चा करून महापौर सुजाता पाटील यांनी मान्यता दिली.
Navi Mumbai Airport: 4 मेट्रो मार्गिकांना जोडणी, दररोज 76 उड्डाणांना सुरुवात; नवी मुंबई विमानतळाचा विस्तार होणार
ठाणे-बेलापूर मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असून, सकाळ-संध्याकाळ कोंडीची समस्या निर्माण होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू तसेच वाशी आणि ऐरोली खाडी जोड पुलांमुळे वाहतुकीत वाढ झाली आहे. त्यातच शहरात पुनर्विकासाचे प्रकल्पही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे भविष्यातील वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने उड्डाणपूल आणि दुहेरी भुयारी मार्ग आवश्यक असल्याचे सागर नाईक यांनी सांगितले. सत्ताधारी नगरसेवकांनी या प्रस्तावाला समर्थन दिले. या प्रस्तावावर चर्चा करताना विरोधकांनी काही आक्षेप नोंदवले. काही ठिकाणी उड्डाणपुलांच्या उभारणीत अनावश्यक खर्च झाल्याचे सांगत या प्रकल्पातही खर्चाची उधळपट्टी होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
प्रकल्प खर्चावर विरोधकांचा सवाल
ठाणे-बेलापूर मार्गावरील उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या प्रस्तावावर विरोधकांनी सभागृहात आक्षेप घेतला. शिवसेना नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी प्रस्ताव मांडण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला. तसेच तांत्रिक सल्लागार नियुक्ती व प्रकल्पाच्या एकूण खर्चाची माहिती सभागृहाला देण्यात आलेली नसल्याचे त्यांनी नमूद केले. खर्चासह प्रस्ताव पुन्हा मांडण्याची मागणीही करण्यात आली. मात्र संख्याबळाच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी प्रस्ताव मंजूर केला. तसेच या कामाचा कंत्राटदार कोण असणार आणि निधी किती दिला जाणार याबाबत माहिती देण्यात आलेली नसल्याचे सांगत पारदर्शक कारभाराची मागणी विजय चौगुले यांनी केली.
Mumbai Local: मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढणार, 34 रेल्वे स्थानकांचा विस्तार सुरू; कल्याण-कसारा, खोपोली मार्गावर फायदा
खर्चाचे नियोजन
हा प्रकल्प ‘हायब्रिड अॅन्युइटी मॉडेल’ (एचएएम – ३०:७०) या आर्थिक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या पद्धतीनुसार एकूण खर्चाच्या ३० टक्के रक्कम सुरुवातीला देण्यात येईल, तर उर्वरित ७० टक्के रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर पुढील दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने अदा केली जाईल. त्यामुळे महापालिकेवर तत्काळ आर्थिक ताण पडणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा