Nashik Woman Assault : लैंगिक अत्याचाराचे पाचपेक्षा अधिक गुन्हे नोंद असलेला संशयित खरात हा धार्मिक विधी व भविष्यवाणीच्या नावे अघोरी कृत्य करीत असल्याचे आरोप आहेत
खरात नेमकं काय करत असे ?
लैंगिक अत्याचाराचे पाचपेक्षा अधिक गुन्हे नोंद असलेला संशयित खरात हा धार्मिक विधी व भविष्यवाणीच्या नावे अघोरी कृत्य करीत होता. त्यासाठी नाशिक शहरातील व इतर ठिकाणच्या बाजारातून शंभर रुपये किलो दराने मिळणारे रानटी चिंचोके खरेदी करायचा. हे चिंचोके नाशिक रोड येथील एका व्यावसायिकाकडे जायचे. हा व्यावसायिक चिंचोके कापडाने घासून स्वच्छ करून त्याचे महागड्या खड्यात रूपांतर करायचा. हेच बनावट खडे खरात मंत्रून दहा हजार ते एक लाख रुपये दराने विक्री करायचा. तर मंतरलेलं मध नऊ लाख रुपये दराने विकायचा. या प्रकरणात नाशिक रोड येथील ‘त्या’ व्यावसायिकापर्यंत लवकरच ‘एसआयटी’ पोहोचण्याची शक्यता आहे.
Lok Sabha Seats : लोकसभेत महिला आरक्षणाची नांदी, मतदारसंघांची संख्या थेट 816 वर पोहोचणार, महाराष्ट्रातूनही 48 ऐवजी 72 खासदार
मंत्र्याच्या नातेवाईकाकडे खासगी कामं
एका मंत्र्याचा नातेवाईक असलेला सिन्नर येथील दीपक हरिश्चंद्र लोंढे हा खरातची सर्व खासगी कामे करीत होता. खरात नाशिकबाहेर जाताना कायम लोंढे त्याच्यासमवेत असायचा. अनेकदा ‘बड्या’ व्यक्तींच्या भेटींवेळीही लोंढे खरातसोबतच होता, असे एका फिर्यादीत स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे खरातच्या ‘कुकर्मां’ची माहिती त्याच्या विशेष जवळीक असणाऱ्यांना होती का, याचाही तपास ‘एसआयटी’ करीत आहे. लोंढेची चार दिवसांपूर्वी ‘एसआयटी’ने चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. नाशिकरोड परिसरातील ‘तो’ व्यावसायिकही आता पोलिसांच्या ससेमिर्यात अडकण्याची चिन्हे आहेत.
अशोक खरात प्रकरणी संसदेत आवाज उठवला; वर्षा गायकवाडांनी भाजपसकट महायुती सरकारला घेरलं
Satara ZP Election : साताऱ्यात पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश, भाजपला शेवटपर्यंत थांगपत्ता नव्हता, फडणवीसांची नाराजी
“अशोक खरात ग्राहकांना घाबरवण्यासाठी प्लास्टिकचे साप, वाघाच्या कातडीच्या नमुन्याचे कापड आणि लपवलेल्या वस्तू वापरून बनावट देखावे तयार करत असे” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. “एका तक्रारदाराने आरोप केला आहे की, खरात या वस्तू बाजारातून आणत असे. ग्राहकांच्या आगमनानंतर तो कथित विधी सुरु करत असे. तो अशा प्रकारे पूर्ण करत असे, की ग्राहक स्पष्टपणे हादरून जात असत. त्यानंतर खरात स्वतःला एक दैवी उपचारक म्हणून भासवत असे. अडथळे दूर करण्यासाठी पूर्वनियोजित विधी करत असे, त्यानंतर पीडित व्यक्ती त्याच्या ट्रस्टला लाखो रुपये दान करत असत” असे अधिकाऱ्याने सांगितले.
