• Sat. Jun 6th, 2026
    Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी, मार्च महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता

    Ladki Bahin Yojana Installment: लाभार्थी महिलांना १५ एप्रिलपर्यंत दोन्ही महिन्यांचे हप्ते मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, ई-केवायसी प्रक्रिया न केलेल्या महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.

    लाडकी बहीण योजना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: मार्चअखेर उजाडूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता रखडल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, आता दोन्ही महिन्यांचे हप्ते एकाच वेळी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हप्ता उशिरा मिळत असल्याच्या तक्रारी अनेक महिलांकडून करण्यात आल्या आहेत. यापूर्वी जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये मिळाला होता. त्यानंतर आता फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ताही रखडल्याने महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

    Maharashtra TimesAshok Kharat Case: खरातच्या ‘कुकर्मां’चा वाढता पाढा! नव्या तीन फिर्यादी, अत्याचाराचे 6 गुन्हे नोंद, कोर्टात आज सर्व खुलासे
    जिल्हा महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित जमा केले जाण्याची शक्यता आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात १५ एप्रिलपूर्वी ही रक्कम जमा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

    Maharashtra TimesAshok Kharat : चिंचोक्याचे खडे बनवून लाखाला विक्री, मधाची किंमत 9 लाख; खरातचे काळे धंदे सांभाळणारा मंत्र्याचा नातेवाईक
    ई-केवायसीसाठी मार्चअखेरची मुदत
    योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी यापूर्वी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक महिलांना तांत्रिक अडचणी आल्याने चुका झाल्या आणि त्यांचा लाभ बंद झाला. या चुका दुरुस्त करण्यासाठी लाभार्थींना अखेरची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार महिलांनी मार्चअखेरपर्यंत आपली ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. यानंतरही चूक राहिल्यास योजनेचा लाभ कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा