• Sat. Jun 13th, 2026
    महाराष्ट्रातील लाइव्ह बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा फक्त एका क्लिकवर


    Breaking News: पुणे महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज, मंगळवारी सादर होणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले हा अर्थसंकल्प सादर करतील. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी नऊ मार्च रोजी १३ हजार ९९५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय आराखडा सादर केला होता. हा आराखडा चालू वर्षाच्या तुलनेत एक हजार ३७७ कोटींनी अधिक आहे. दरम्यान, अमेरिकेने आता इराणला सामुद्रधुनी खुली करण्यासाठी पाच दिवसांची मुदत दिली आहे. पुढील काही दिवस इराणच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ले करणार नाही, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी जाहीर केले. मात्र, ट्रम्प यांनी आपल्याला घाबरून माघार घेतल्याचा दावा इराणने केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed