Gadchiroli News: दारु पिऊन बायकोला मारहाण केल्यास हजार रुपये दंड भरावा लागेल, असा गडचिरोली जिल्ह्यातील ब्राह्मणपल्ली ग्रामसभेने ठराव मंजूर करण्यात आला.
ब्राह्मणपल्ली हे गडचिरोली शहरापासून १३० किलोमीटर अंतरावर आहे. गावाजवळून छत्तीसगडची सीमा अगदीच जवळ आहे. गावात दारूमुळे दररोज हाणामाऱ्या, कौटुंबिक हिंसाचार वाढला होता. गाठीशी असलेला पैसा दारूसाठी उडविला जात असल्याने मुलांचे शिक्षण आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होत होता. ही परिस्थिती बदलण्यासाठी ‘मुक्तिपथ’च्या माध्यमातून कार्य करण्यात आले. यातूनच रविवारी झालेल्या ग्रामसभेत ब्राह्मणपल्लीला दारूमुक्त घोषित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या नियमांची अंमलबजावणी आणि देखरेखीसाठी गावपातळीवर एक समिती स्थापन करण्यात आली. दारूविरोधी नियमांचा एक संच तयार करण्यात आला.
Sushma Andhare: आमची नाकेबंदी करणाऱ्यांची लोकसभेत कोंडी करु! सुषमा अंधारेंचा चंद्रपुरातून थेट इशारा
यानुसार दारू विकताना पकडल्यास आणि दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करणाऱ्या किंवा गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीसाठी दंड निर्धारित करण्यात आला. दारूविक्रेत्यांना पाठिंबा देणाऱ्या किंवा त्यांना संरक्षण देणाऱ्यांना दोन हजार रुपये दंड भरावा लागेल. केवळ दंडच नव्हे, तर गावात लपून-छपून दारूविक्री करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठीही बक्षीस आहे.
Satara ZP Election : साताऱ्यात पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश, भाजपला शेवटपर्यंत थांगपत्ता नव्हता, फडणवीसांची नाराजी
अवैध दारू विक्रेत्याची माहिती दिल्यास किंवा त्याला पकडून दिल्यास पाच हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविले जाणार आहे. दारूविक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांना ‘रोजगार हमी योजने’च्या कामावर घेण्यास मज्जाव करण्यात आला असून, त्यांचे रेशन कार्डावरील धान्य बंद करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. दंडाच्या या रकमेतून शाळांची दुरुस्ती, आरोग्यसुविधा, रस्ते दुरुस्ती आणि गावाच्या सुशोभीकरण केले जाणार आहे.
दारूविक्री केल्यास दंड : २०,००० रुपये
दारूविक्रीची माहिती दिल्यास बक्षीस : ५,००० रुपये
