• Mon. Jun 15th, 2026
    Pune News : पुणे तिथे काय उणे… पत्नी नांदायला येईना म्हणून तिची स्कुटीच पेटवली!

    पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने चुकीचं पाऊल उचललं आहे. त्याने थेट पत्नीची स्कुटी पेटवून टाकली आहे. या घटनेची सध्या शहरात चांगलीच चर्चा होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : वारजे परिसरात कौटुंबिक वादातून आगळावेगळाच प्रकार घडला. त्यामुळे वारजे परिसरातील नागरिक मात्र हैराण झाले आहेत. झालं असं… दीड वर्षांपासून सुरू असलेल्या पती-पत्नीतील वाद थेट दुचाकी जाळण्यापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित दाम्पत्य काही काळापासून वेगळं राहत होतं. पत्नी माहेरी राहात असताना पतीकडून तिला पुन्हा सासरी येण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात होते. मात्र, पत्नीने परतण्यास नकार कायम ठेवला होता.

    या पार्श्वभूमीवर पतीने संतापाच्या भरात थेट कृती करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले. तो रात्री उशिरा पत्नी राहत असलेल्या सोसायटीत गेला. परिसराची पाहणी करून त्याने पार्किंगमध्ये उभी असलेली पत्नीची दुचाकी ओळखली. यानंतर त्याने दुचाकीवर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली. काही वेळातच आगीने तीव्र रूप धारण करत वाहन पूर्णतः जळून गेले. अचानक लागलेल्या आगीमुळे सोसायटीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

    घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तपासाच्या आधारे पतीची ओळख पटवण्यात आली आणि त्याला अटक करण्यात आली.

    या प्रकरणात संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कौटुंबिक मतभेद वेळेत न सोडवल्यास ते किती गंभीर स्वरूप धारण करू शकतात, याचे हे पुण्यातील एक उदाहरण ठरत आहे.

    दरम्यान, या घटनेची सध्या परिसरात चांगलीच चर्चा होत आहे. खरेतर पती-पत्नीचे नाते हे विश्वास, प्रेम आणि परस्परांचा सन्मान यावर अवलंबून असते. याच गोष्टी दोघांच्या संसारासाठी महत्त्वाच्या असतात. पण काही वेळेला पती-पत्नीच्या नात्यात कधी विश्वास कमी पडतो, कधी प्रेम कमी पडते तर कधी सन्मान कमी पडतो, त्यातून अशा प्रकारच्या घटना घडतात.

    काही घटनांमध्ये पुरुष हे महिलांना कमी लेखतात, त्यातून त्यांच्यात वाद होता. या वादाचे गंभीर परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावर पडतात. त्यामुळे जोडीदाराचा सन्मान ठेवणं जास्त आवश्यक आहे. तसेच कोणताही वाद असला तरी तुटेल इतकं ताणू नये असं म्हटलं जातं.

    योग्यप्रकारे संयमाने संवाद ठेवून चर्चेतून वाद मिटवणे आवश्यक असते. अबोला किंवा माहेरी निघून जाण्याने दोघांच्या नात्यातील दरी जास्त वाढते. तसेच एखाद्या पतीने पत्नीला छळले असेल तर त्या महिलेने योग्य कायदेशीर मार्ग लवकर निवडणे आवश्यक असते. कारण असे पती महिलेच्या जीवासाठी धोक्याचे ठरु शकतात.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा