• Tue. Aug 4th, 2026

    पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना शोक – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 4, 2026
    पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना शोक – महासंवाद

    मुंबई, दि. ४ : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक कार्य आणि सहकार क्षेत्रातील एक दूरदर्शी नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शोक व्यक्त केला.

    मंत्री मुश्रीफ म्हणाले, डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षणाचा दीप ग्रामीण भागापर्यंत पोहोचवत लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात त्यांनी उभारलेल्या संस्था दर्जेदार शिक्षण, संशोधन आणि आरोग्यसेवेचे उत्कृष्ट केंद्र बनल्या. महाराष्ट्रासह देशाच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासात त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांचे कार्य, दूरदृष्टी आणि समाजसेवेचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे.

    ईश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना, आप्तेष्टांना तसेच असंख्य विद्यार्थ्यांना व अनुयायांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो या शब्दात मंत्री मुश्रीफ यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

    0000

    दत्तात्रय कोकरे/विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed