• Tue. Aug 4th, 2026

    वराड साठवण तलाव बंधारा नव्याने उभारण्याबाबत अभ्यासपूर्वक निर्णय घेऊन प्रस्ताव सादर करावा – मंत्री संजय राठोड – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 4, 2026
    वराड साठवण तलाव बंधारा नव्याने उभारण्याबाबत अभ्यासपूर्वक निर्णय घेऊन प्रस्ताव सादर करावा – मंत्री संजय राठोड – महासंवाद

    मुंबई, दि. ४ : ब्रिटीशकालीन वराड साठवण तलाव बंधाऱ्यांच्या संरचनेची सद्यस्थिती, आयुर्मान, तांत्रिक बाबी तापसून शासकीय नियमांचा सखोल अभ्यास करून बंधारा नव्याने उभारण्याबाबत अथवा आवश्यकतेनुसार प्रमुख दुरुस्ती करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिल्या.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील ब्रिटीशकालीन वराड साठवण तलावाचा बंधारा संपूर्ण नव्याने बांधण्याबाबत मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. बैठकीस मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय देवराज तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    पावसाळ्यानंतर तलावांमधील गाळ काढणे, बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे आणि पाणीसाठा वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात यावे. नवीन बांधकामाचा खर्च आणि प्रमुख दुरुस्तीचा खर्च यांचा तुलनात्मक अभ्यास करून लोकहिताचा निर्णय घेण्यात यावा, अशा सूचनाही मंत्री राठोड यांनी दिल्या.

    ००००

    मोहिनी राणे/स.सं

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed