• Sun. Jun 14th, 2026
    Electric Shock Death: नाशकात विजेच्या धक्क्याने 19 म्हशींचा मृत्यू; निष्काळजीपणाचा वीज विभागावर आरोप

    Electric Shock Death: म्हसरूळ परिसरात रामेश्वरनगर येथील एका गोठ्यात १९ म्हशींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

    electric shock death(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, पंचवटी: म्हसरूळ परिसरातील रामेश्वरनगर येथे गोठ्यातील १९ म्हशींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. वीज विभागाच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप अमन अफजल कुरेशी व त्यांच्या कुटुंबीयांनी केला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

    कुरेशी कुटुंबाचा सुमारे ५० म्हशींचा गोठा असून, गोठ्यावरून वीज वाहिनी गेली आहे. या ठिकाणी वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने कुटुंबीयांनी सुमारे पंधरा दिवसांपूर्वी वीज विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर विभागाकडून केबल बदलण्यात आली होती. मात्र, ती निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    Chhagan Bhujbal | अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना कॅप्टन खरातने दिलेला शाप, भुजबळ काय म्हणाले?

    शुक्रवारी (दि. २०) गोठ्यालगतच्या वीज खांबावर शॉर्टसर्किट होऊन वायर तुटून गोठ्याच्या पत्र्यावर पडली. पत्रे लोखंडी असल्याने संपूर्ण गोठ्यात वीजप्रवाह उतरला आणि त्यात १९ म्हशींचा जागीच मृत्यू झाला. या वेळी अमन कुरेशी गोठ्यात उपस्थित होते. त्यांनी प्रसंगावधान राखत मीटरमधून वीजपुरवठा बंद करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर वीज विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असता, ही चूक मीटरमधील असल्याचे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कुरेशी कुटुंबीयांनी केला. नगरसेविका दीपाली गिते यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली व वीज विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

    Maharashtra TimesNeeraj Jadhav : अशोक खरात प्रकरण; सगळं कांड ज्याच्यामुळे उघड, त्या ‘मास्टरमाइंड’ नीरज जाधवचा फोटो समोर
    चाळीस लाखांचे नुकसान
    या घटनेत सुमारे ४० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, कुरेशी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, संपूर्ण नुकसानभरपाई द्यावी आणि निकृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा