• Sun. Jun 7th, 2026
    Vasai Accident : मैत्रिणींसोबत खेळताना काळाची झडप, भरधाव टेम्पोची चिमुकलीला जोरदार धडक; घरासमोरच निक्षाचा करुण अंत

    Palghar Accident News : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्यानंतर आता खेरपाडा-दुर्गानगर परिसरात देखील अपघात झाला आहे. या अपघातात ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

    वसई अपघात चार वर्षीय मुलीचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमूलकुमार जैन, पालघर : वसई पूर्वेकडील खेरपाडा-दुर्गानगर परिसरात झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला असून, घरासमोर खेळणाऱ्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीचा टेम्पोखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका क्षणात आयुष्य संपवणाऱ्या या घटनेमुळे हळहळ आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.

    नेमकी घटना काय?

    काल शनिवारी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास डी. के. स्कूलजवळ ही घटना घडली. निक्षा शर्मा (वय ४ वर्ष) ही चिमुरडी आपल्या घरासमोर मित्रांसोबत खेळत होती. त्याचवेळी पाणी वाहून नेणारा एक भरधाव पिकअप टेम्पो त्या मार्गावरून येत होता. खेळण्यात मग्न असलेल्या या चिमुरडीला टेम्पो चालकाने पाहिलं नाही आणि ती अचानक वाहनाच्या चाकाखाली आली. अपघात इतका भीषण होता की तिचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना भरवस्तीत घडल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ‘खेळण्याचे वय आणि मृत्यूची वेळ’, अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी वाहनचालकांच्या निष्काळजीपणावर तीव्र टीका केली आहे. भरधाव वाहनांचा वाढता वेग आणि रस्त्यावरील बेफिकीरपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
    Maharashtra TimesYavatmal Crime: सात वर्षीय बेपत्ता मुलीची शेजाऱ्याच्या घरात आढळली बॉडी; पोलिसांनी दोन भावांना केली अटक

    परिसरात हळहळ

    घटनेची माहिती मिळताच वाळीव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण वसई परिसर शोकमग्न झाला असून, निष्पाप जीव गमावल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी आणि वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

    त्रिकोणी कुटुंबाचा क्षणार्धात करुण अंत

    दरम्यान, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील ढेकाळे येथील वाघोबा खिंड परिसरात एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मोटरसायकलवरील तिघांचा मृत्यू झाला आहे. भरत शंकर माघी, वंदना भरत माघी आणि सुर्या भरत माघी अशी मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावे असून हे सर्व विक्रमगड येथील राहणार आहेत.
    Maharashtra Timesमृत्यूशी झुंज संपली! 16 दिवसांनंतर Hit And Run केसमधील जखमी हरमनचाही अंत, कुटुंबावर दु:खाचा डोंगर
    अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील कार्यवाही सुरू आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू असून मनोर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मनोर ग्रामीण रुग्णालयात हलवले आहेत. दरम्यान, अपघात करून फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून पुढील तपास सुरू आहे. अतिशय भयंकर हा अपघात घडला असून शनिवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा