Palghar Accident News : ढेकाळे येथील वाघोबा परिसरात एक भीषण अपघात झाला आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. क्षणार्धात त्रिकोणी कुटुंबाचा अंत झाला आहे.
नेमका कसा झाला अपघात?
अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील कार्यवाही सुरू आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू असून मनोर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मनोर ग्रामीण रुग्णालयात हलवले आहेत. दरम्यान, अपघात करून फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून पुढील तपास सुरू आहे. अतिशय भयंकर हा अपघात घडला असून शनिवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे.
Mumbai Crime: मुंबईमध्ये हत्या प्रकरणांची मालिका; वडाळ्यात पत्नीला संपवलं, अँटॉप हिलमध्ये २४ वर्षीय तरुणाची बॉडी सापडली
मुंबई–गोवा महामार्गावर भीषण अपघात
दरम्यान, काल पेण तालुक्यातील आंबिवली गाव हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. अतिवेग, निष्काळजीपणा आणि नियंत्रण सुटलेले वाहन यांचा संगम झाल्याने एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला. गुढीपाडव्याच्या दिवशीच काळाने झडप घालत या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Neeraj Jadhav : अशोक खरात प्रकरण; सगळं कांड ज्याच्यामुळे उघड, त्या ‘मास्टरमाइंड’ नीरज जाधवचा फोटो समोरदि. १८ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास आंबिवली गावाच्या हद्दीत नवीन साई सहारा हॉटेलसमोर हा अपघात घडला. अक्षत बाबूलाल राठोर (वय ३५, रा. जेएनपीटी टाउनशिप, उरण) हा त्याच्या ताब्यातील एक्सएल ६ कारने पेणहून पनवेलकडे जात असताना अतिवेगात वळण घेत होता. वेगावर नियंत्रण सुटल्याने त्याने निष्काळजीपणे वाहन चालवत उजव्या बाजूने जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार शुभम देविदास पाटील (वय २७, रा. आंबिवली, ता. पेण) गंभीर जखमी झाला.
