• Tue. Jun 16th, 2026

    बीकेसी ते शिळफाटा 20 किमी भुयारी मार्गातून धावणार ‘बुलेट ट्रेन’; डोंगर, खाडीखालूनही बोगदा, लवकरच खोदकाम सुरू

    बीकेसी ते शिळफाटा 20 किमी भुयारी मार्गातून धावणार ‘बुलेट ट्रेन’; डोंगर, खाडीखालूनही बोगदा, लवकरच खोदकाम सुरू

    BKC To Shilphata Bullet Train: देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबईमध्ये सुरू होणार आहे. पण मुंबईतील दात लोकवस्ती आणि मेट्रोच्या कामांमुळे बहुतांश मार्ग जमिनीखालून तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

    मुंबई: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम आता वेगाने सुरू होणार आहे. मुंबईतील भूमिगत भागांसाठी खोदकाम लवकरच सुरू होणार असल्यामुळे निश्चित वेळेत बुलेट ट्रेन मुंबईमध्ये सुरू होईल अशी अपेक्षा आहे. सोमवारी या भागाच्या खोदकामासाठी लागणारे दोन टनेल बोरिंग मशीन जवाहरलाल नेहरू बंदरात दाखल होणार आहे. अनेक कारणांमुळे चीनमध्ये मालवाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक महिन्यांपासून हे रखडले होते.

    पहिला भाग 2025मध्येच दाखल

    पहिल्या टनल बोरिंग मशीनचा काही भाग सप्टेंबर 2025मध्येच मुंबईत पोहचला होता. पण त्यानंतर मालवाहतूक प्रक्रियेतील अडचणींमुळे पुढील काम रखडले आणि मुंबईत खोदकाम सुरू करण्यात विलंब झाला. पण आता या फेरीत पहिल्या मशीनच्या उर्वरित भागांसह दुसऱ्या मशीनसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी मुंबईत येणार आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा माल मार्चच्या सुरुवातीला चीनमधून निघाला आणि चेन्नई बंदरात पोहचला. चेन्नईहून माल 18 मार्च रोजी मुंबईसाठी रवाना झाला असून सोमवारी, 23 मार्च रोजी दाखल होईल.Maharashtra TimesMumbai Metro: भुयारी मेट्रोत पुन्हा ‘नो नेटवर्क’, कंत्राटदारासोबत करार रद्द करण्याचा निर्णय; सर्व कंपन्यांच्या सेवा होणार बंद

    हे मशीन दाखल होताच त्यांची जोडणी आणि चाचणी करून सुमारे तीन महिन्यांमध्ये खोदकाम सुरू होईल अशी अपेक्षा आहे. वांद्रे-कुर्ला संकुल ते शिळफाटादरम्यान 20.37 किमी मार्ग भूमिगत असणार आहे. या भागाच्या खोदकामासाठी या मशीचा वापर करण्यात येणार आहे. शिवाय या मार्गावरील 7 किमी बोगदा ठाण्याच्या खाडीखालून जाणार आहे. हे खोदकाम सर्वात आव्हानात्मक ठरणार आहे.

    कसा असेल मार्ग?

    मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन देशातील पहिली बुलेट ट्रेन असणार असून ताशी 320 किमी वेग असेल. मुंबईतील भुयारी बोगदे जमीनीखाली 25 ते 65 मीटर खोल असतील. शिळफाटा जवळ पार्सिक डोंगरांखाली हा बोगदा 114 मीटर खाली असेल. दरम्यान, वेळेत काम पूर्ण करण्यासाठी गरज पडल्यास तिसरी मशीनही आणण्याची योजना आहे. बीकेसी ते शिळफाटादरम्यान एकाच बोगद्यात अप आणि डाऊन हे रेल्वे मार्ग असतील.

    Maharashtra TimesRailOne App: लोकल प्रवाशांच्या तिकीट खिडकीवर पुन्हा रांगा! तांत्रिक अडचणींमुळे ‘रेलवन’कडे पाठ; नोंदणी, पास खरेदी प्रक्रियेत गोंधळ

    मुंबई-अहमदाबात बुलेट ट्रेनचा मार्ग एकूण 508 किमी लांब असेल. यापैकी 97 किमी सूरत ते वापीदरम्यान मार्ग ऑगस्ट 2027मध्ये सुरू होणार आहे. यानंतर देशात आणखी 7 बुलेट ट्रेन प्रकल्प तयार करण्याची योजना आहे. यापैकी एक बुलेट ट्रेन मुंबई ते पुण्यादरम्यान बनणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा