Nashik Ashok Kharat Case : अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या मर्जीतील ऑफिस बॉय नीरज जाधव हाच या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं निष्पन्न झालं आहे.
नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरातील ओजस प्रॉपर्टीज या कार्यालयाच्या भिंतींआड सुरू असलेल्या वासनांध खेळाचा पडदा आता फाटला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित अशोक खरात याच्या मर्जीतील ऑफिस बॉय नीरज जाधव हाच या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं निष्पन्न झालं आहे. नीरजने केवळ खरातच्या दुष्कृत्यांचे व्हिडिओच केले नाहीत, तर त्याआधारे खरातलाच 5 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल केल्याची मोठी माहिती समोर आली आहे.
Ashok Kharat Case: अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांबद्दल थेट विधीमंडळात मोठा खुलासा होणार; IPS सातपुतेंच्या टीमने फास आवळला!
एखाद्या सिनेमाला शोभेल अशी गुप्तता पाळत आणि नियोजनबद्ध पद्धतीने कॅप्टन अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली असल्याचं समोर आलं आहे. या कारवाईदरम्यान खरात याला अटक करणाऱ्या पोलिसांनाच संतापात भोंदू खरात याने शाप दिल्याची संतापनक माहिती देखील समोर आली आहे.
Ashok Kharat Case: भोंदूबाबा खरातला कठोर शिक्षा द्या! संतप्त मिरगावकरांची मागणी; ग्रामसभेत गावबंदीचा इशारा
नेमकं काय घडलं?
कॅप्टन खरात ऑपरेशन राबविताना पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली होती. ही संपूर्ण कारवाई इतकी गोपनीय होती की, या कारवाईदरम्यान सहभागी असलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांनाही आपण नेमकं कोणाला पकडण्यासाठी जात आहोत? याची पुसटशी कल्पना देखील नव्हती. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं सांगून पोलिसांची 5 पथक तयार करण्यात आली होती. हातात लाठ्या आणि हेल्मेट परिधान करून मोहिमेत सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मोहिमेच्या शेवटपर्यंत माहिती नव्हती. ज्याठिकाणी ही कारवाई करायची होती त्याठिकाणी पोहोचल्यावर ‘चोर शिरल्याचा बनाव’ करत पोलिसांनी सापळा रचला आणि अचानक अशोक खरात उर्फ कॅप्टन याला ताब्यात घेतलं. या घटनेमुळे संपूर्ण नाशकात संतापाची लाट पसरली आहे.
