• Fri. Jun 19th, 2026
    दिवसभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर


    Latest Marathi News: भविष्यातील घटनांची भीती दाखवून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अशोक खरात उर्फ कॅप्टनच्या कुकर्मांचा भंडाफोड नाशिकमध्ये गुन्हा नोंद होण्यापूर्वीच झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या दाखल झालेल्या गुन्ह्यांप्रकरणी ‘एसआयटी’ने तपासचक्राला वेग दिला आहे. पोलिसांनी पीडितांचा शोध सुरू केला असून, ‘एसआयटी’ने महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्येही (एमपीए) चौकशीसत्र राबवले. दरम्यान, पश्चिम आशियातील तणाव वाढत असताना, इराणच्या नतांझ येथील अणुऊर्जा प्रकल्पावर शनिवारी हवाई हल्ला झाला. या हल्ल्यामुळे कोणताही किरणोत्सर्ग झाला नसल्याचे इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने म्हटले आहे. दुसरीकडे, इस्रायलने या हल्ल्याशी संबंध नाकारला असून इराणवर हल्ले वाढवण्याचा इशारा दिला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed