• Sat. Jun 6th, 2026

    भुयारी मेट्रोत पुन्हा ‘नो नेटवर्क’, कंत्राटदारासोबत करार रद्द करण्याचा निर्णय; सर्व कंपन्यांच्या सेवा होणार बंद

    भुयारी मेट्रोत पुन्हा ‘नो नेटवर्क’,  कंत्राटदारासोबत करार रद्द करण्याचा निर्णय; सर्व कंपन्यांच्या सेवा होणार बंद

    Cuff Parade-Aarey JVLR Metro: भुयारी मेट्रो सुरू झाल्यापासूनच प्रवासी नेटवर्कच्या समस्यांमुळे त्रासले आहेत. त्यात आता सर्व नेटवर्क कंपन्यांच्या सेवा बंद होणार असल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मेट्रो तीनमधून प्रवास करताना मोबाइल नेटवर्क सातत्याने मिळत नाही. मात्र आता हे नेटवर्कच गायब होणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) दूरसंचार पायाभूत सुविधा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. करारातील अटी पूर्ण करण्यात अपयश आल्यामुळे त्यांची सेवा समाप्त करण्यात आली. त्यामुळे नेटवर्कवर परिणाम होणार आहे.

    काही प्रमाणात नेटवर्क होतं

    कफ परेड ते आरे या ३३ किमीच्या भुयारी मेट्रो तीन मध्ये जिओ आणि एअरटेल कंपनीचे काही ठिकाणी मोबाइल नेटवर्क मिळत होते. जेव्हीएलआर ते वरळीदरम्यान व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएल या कंपन्यांचे काही प्रमाणात नेटवर्क उपलब्ध होते. मात्र हे संपूर्ण नेटवर्क जाणार असल्याने मेट्रो प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सौदी अरेबिया येथील एसीईएस इंडिया कंपनीने सर्व भूमिगत स्थानके आणि बोगद्यांमध्ये सामाईक दूरसंचार प्रणाली बसवली होती.Maharashtra TimesRailOne App: लोकल प्रवाशांच्या तिकीट खिडकीवर पुन्हा रांगा! तांत्रिक अडचणींमुळे ‘रेलवन’कडे पाठ; नोंदणी, पास खरेदी प्रक्रियेत गोंधळ

    एसीईएस इंडियाचा हा तृतीय-पक्ष कंत्राटदाराचा करार रद्द केला आहे. संपूर्ण मार्गावर अखंड मोबाइल नेटवर्क पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नव्या सेवा पुरवठादाराची नियुक्ती करण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, असे एमएमआरसीएलच्या प्रवक्त्यांनी सांगितले. दरम्यान, यासाठी निश्चित कालमर्यादा सांगण्यात आलेली नाही. दादरवरून कफ परेड असा प्रवास करताना मी मेल, चॅटसह अन्य सुविधांचा वापर करत होतो. त्यातही काही प्रमाणात अडथळे होते. आता संपूर्ण नेटवर्क गेल्यास प्रवासात काम करणे शक्य होणार नाही, असे प्रवासी गणेश साठे यांनी सांगितले.

    Maharashtra TimesMumbai Local: एक-दोन नव्हे तर 238 बंद दरवाजांच्या लोकल मुंबईसाठी! केंद्राकडून 3 हजार कोटींचा आधार; रेल्वे मंत्र्यांची माहिती

    मालाड दुर्घटनेनंतर संतापाची लाट

    मालाड परिसरातील धक्कादायक घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, अपूर्ण बांधकाम प्रकल्पातील निष्काळजीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. आठ वर्षीय दिव्यांश मौर्य याचा पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याने सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दिव्यांश गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजता घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. बराच वेळ परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. रात्री उशिरापर्यंत त्याचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर पहाटेच्या सुमारास वडिलांनी जवळच्या बांधकामस्थळी शोध घेतला असता, पाण्याने भरलेल्या उघड्या खड्ड्यात तो आढळून आला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा