• Tue. Jun 16th, 2026
    Weather Update: मुंबईत पुन्हा उन्हाचा ‘ताप’! मार्चमध्ये चौथ्यांदा उष्ण वातावरणाचा इशारा; पुण्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’

    Maharashtra Weather Update 22 March 2026: कोकण विभागात सर्वदूर उष्ण वातावरणाची स्थिती असताना मध्य महाराष्ट्र, मराठवाडा; तसेच विदर्भात मात्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकेल.

    महाराष्ट्र हवामान अपडेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : राज्यभरात निर्माण झालेल्या पावसाळी वातावरणामुळे मुंबईत मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात काहीसा दिलासा मिळाला. मात्र, येत्या आठवड्यात पुन्हा वातावरण तापेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. २३ आणि २४ मार्च रोजी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये उष्ण वातावरणासाठीचा ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे.

    पुणे, सातारा, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशीव येथे सोमवारी मेघगर्जनेसह पावसासाठी ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. पुणे, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ येथे मंगळवारी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकेल.

    Maharashtra TimesBMC Deputy Mayor Alka Kerkar : मुंबईच्या माजी उपमहापौर अलका केरकर यांचं निधन, लिलावती रुग्णालयात अखेरचा श्वास
    फेब्रुवारीमध्येच यंदा उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली होती. मार्चमध्ये पहिल्याच आठवड्यात वातावरणही तापले होते. पहिल्या पंधरवड्यात तीनदा उष्ण वातावरण आणि काहिलीचा मुंबईकरांनी अनुभव घेतल्यानंतर राज्यभरात निर्माण झालेल्या अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे कमाल तापमानाचा पारा थोडा खाली आला होता. मुंबईत ३० ते ३१ अंशांदरम्यान कमाल तापमान नोंदले गेले. मात्र, आता पारा पुन्हा चढायला सुरुवात होईल अशी शक्यता आहे.

    कुलाबा आणि सांताक्रूझ येथे शनिवारी कमाल तापमान पुन्हा सरासरीहून अधिक नोंदले गेले. सांताक्रूझ येथे शुक्रवारी ३१.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. शनिवारी यात २.५ अंशांहून अधिक वाढ होऊन ते ३३.९ अंशांवर पोहोचले. कुलाबा येथे शुक्रवारी ३२.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. या तापमानात कुलाबा येथे शनिवारी फारशी वाढ नव्हती. या केंद्रावर ३२.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

    Maharashtra TimesAshok Kharat सोबतच्या फोटोंवर दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, ‘फोटो प्रसिद्ध करणं ही अतिशय चुकीची बाब’
    शनिवारी जारी केलेल्या अंदाजानुसार, २३ मार्च आणि २४ मार्च रोजी मुंबई तसेच ठाणे आणि रायगडच्या तुरळक भागांमध्ये उष्ण वातावरणाची शक्यता आहे. सोमवार, २३ मार्च रोजी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वातावरण तापलेले असेल, असा अंदाज आहे.

    अवकाळीचा फटका
    मराठवाड्यात लातूर, धाराशिव, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या जिल्ह्यात येत्या २५ मार्चपर्यंत वादळासह हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस होण्याचा अंदाज आहे. सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू असल्यामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

    Maharashtra Times‘त्या’ संस्थेसाठी मविआ सरकारच्या काळात पाणी आरक्षित? Uddhav Thackeray म्हणाले, ‘खरात प्रकरणात ‘पाणी’ कुठवर मुरलं आहे, चौकशी करा’
    एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चढउतार
    ‘पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होत आहे. अजूनही वाऱ्यांची दिशा स्थिरावलेली नाही. ती बदलण्याच्या काळात वातावरणात चढउतार होत असतात,’ अशी माहिती प्रादेशिक हवामान विभाग अधिकाऱ्यांनी दिली. मार्चमध्ये सर्वसाधारणतः वातावरण कोरडे असते; पण पश्चिमी प्रकोप सक्रिय असल्याने कोकण विभागात आर्द्रता आणि उर्वरित महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे चढउतार जाणवण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा