Pune News: हा प्रकल्प झाल्यास खेड शिवापूर टोलनाका आणि रिंग रोड परिसरातील नागरिकांना जलद प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षा स्मिता वस्ते म्हणाल्या, ‘दक्षिण पुणे, कात्रज परिसर; तसेच शिवापूर टोलनाका आणि प्रस्तावित रिंग रोडलगत झपाट्याने वाढणारी वसाहत व वाहतुकीचा ताण लक्षात घेता मेट्रोचा विस्तार आवश्यक आहे. प्रस्तावित रिंग रोडशी मेट्रोची कनेक्टिव्हिटी निर्माण झाल्यास शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक मदत होणार आहे. भाजपच्या नगरसेविका वर्षा तापकिर यांनी हा प्रस्ताव दिला होता. नगरसेवकांच्या मागणीवरून हा प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे. या मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार झालेला नाही. तसेच प्रशासनाकडूनही त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही.
स्वारगेट ते कात्रज हा मेट्रोच्या विस्तारित टप्प्यातील एक अत्यंत महत्त्वाचा भुयारी मार्ग आहे. सुमारे साडेपाच किलोमीटर लांबीच्या या मार्गावर तीन स्थानके असणार आहेत. केंद्र सरकारने याला मार्गाला मंजुरी दिली असून, याच्या खोदकामाचे नियोजन सुरू केले आहे. कात्रज मेट्रो शिवापूर टोलनाक्यापर्यंत वाढविण्याची मागणी शहर सुधारणा समितीत मान्य करण्यात आली असून, यावर सर्वसाधारण सभेत चर्चा झडणार आहे.
गोळीबार मैदान चौकात आज वाहतुकीत बदल
‘रमजान ईदनिमित्त आज (शनिवारी) लष्कर भागातील गोळीबार मैदानासमोरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण होणार असल्याने सकाळी सहा ते साडेअकरा वाजेपर्यंत गोळीबार मैदान चौक परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा,’ असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले होते.
