कॅप्टन अशोक खरात प्रकरणाची नाशिकमध्ये SIT कडून अतिशय गुप्त पद्धतीने चौकशी सुरू. हिमांशू पोलीस क्लबमध्ये १२ अधिकाऱ्यांचा ताफा तैनात असून तेजस्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल सीडीआर आणि सीसीटीव्ही फुटेजची झाडाझडती घेतली जात आहे.
12 अधिकाऱ्यांकडून चौकशी
आज पुन्हा त्याला दुपारच्या सुमारास पोलिस वाहनाने गुप्ता पद्धतीने हिमांशू क्लब या ठिकाणी मागच्या दाराने आत नेण्यात आले आहे. SIT च्या एकूण १२ अधिकारी यांच्याकडून खरात याची चौकशी केली जात आहे.त्यामुळे आता ही चौकशी नेमकी किती वेळ सुरू असणार आहे आणि कॅप्टन खरात प्रकरणात आज काय काय खुलासे होतात हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.
‘या’ मुद्यांआधारे चौकशी
भोंदूबाबा कॅप्टन खरातने अनेक महिलांचे शोषण केल्याची माहिती असून त्याबाबत सर्व माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणात सध्या तीन महिला तक्रार देण्यासाठी पुढे आल्या आहेत, आणखी काही महिला पुढे येण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे.
‘त्या’ संस्थेसाठी मविआ सरकारच्या काळात पाणी आरक्षित? Uddhav Thackeray म्हणाले, ‘खरात प्रकरणात ‘पाणी’ कुठवर मुरलं आहे, चौकशी करा’
नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये कॅप्टन खरातसह त्याच्या संपर्कातील अन्य लोकांच्या विरोधातील लैंगिक अत्याचार, खंडणी आणि ब्लॅकमेलिंगच्या तक्रारींची माहिती घेणे सुरू केले आहे,
भोंदूाबाबा कॅप्टन खरातचे कार्यालय, निवासस्थानावरील लॅपटॉप, कम्प्युटर, हार्ड डिस्क आणि सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरू तसेच कॅप्टन अशोक खरात याच्या मोबाईलमधील सर्व संभाषणाचे सीडीआर काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता या तपासामधून समोर काय येते हे पाहणे महत्त्वाचे मानले जात आहे.
१०० हून अधिक व्हिडिओ
दरम्यान, आतापर्यंत भोंदूबाबा खरातचे १०० हून अधिक व्हिडिओ समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.
