• Sun. Jun 7th, 2026
    पुण्यातील दोन खुनांची रहस्यं 21 महिन्यांनी उलगडली, बिबट्याच्या पायाचे ठसे उमटवून भास, तरुणाला अटक

    Pune Minor Boys Killing : वन विभागाने सुरुवातीलाच हा बिबट्याचा हल्ला नसल्याचे स्पष्ट केले होते, तरीही तत्कालीन पोलिसांनी तपासात गांभीर्य दाखवले नसल्याचं बोललं जातं

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, पुणे : दहिवडी (ता. शिरुर) येथील मांजरे वस्तीत गेल्या २१ महिन्यांपासून सुरू असलेले मृत्यूचे रहस्य आता एका भीषण सत्यासह समोर आले आहे. मागील वर्षी झालेल्या अल्पवयीन मुलाचा मृत्यू बिबट्याचा हल्ला नसून, तो खूनच होता, हे आता उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे, त्या अल्पवयीन मुलाचा खून ज्या क्रूर पद्धतीने करण्यात आला होता, त्याच पद्धतीने दुसऱ्या बालकाचाही बळी घेण्यात आला. या दोन्ही घटनांमधील गुन्हेगार एकच असल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सध्या त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    नेमकं काय आहे प्रकरण?

    २१ जून २०२४ रोजी एका दहा वर्षांच्या मुलाचं शव शेतात आढळून आला होता. त्या वेळी त्याच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या. मात्र, परिसरात बिबट्याची दहशत असल्याने हा हल्ला वन्य प्राण्यानेच केला असावा, असा कयास पोलिसांनी बांधला.
    Maharashtra TimesAshok Kharat : चोर आलेsss अशोक खरातच्या ‘तृप्तबाला’ बंगल्याबाहेर पोलिसांचं सोंग, ‘भोंदू कॅप्टन’ डोळे चोळत अर्धवट कपड्यात बाहेर, खाकी वर्दीने गराडा घातला

    वन विभागाचं स्पष्टीकरण तरीही…

    वन विभागाने सुरुवातीलाच हा बिबट्याचा हल्ला नसल्याचे स्पष्ट केले होते, तरीही तत्कालीन पोलिसांनी तपासात गांभीर्य दाखवले नाही. अगदी मुलाच्या शर्टवर बिबट्याच्या पायाचे ठसे असल्याचा बनाव करून तपास वन विभागाकडे ढकलून दिला गेला. रक्ताच्या नमुन्यात वन्य प्राण्याचा अंश नसल्याचे सिद्ध होऊनही पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले.

    चाकणकर, तटकरेंवर अंजली दमानिया तुटून पडल्या; जयंत पाटलांच्या चौकशीची मागणी

    ग्रामस्थ आक्रमक, पोलिसांवर रोष

    दरम्यान, १९ मार्च २०२५ रोजी आणखी एका बालकाचं शव त्याच ठिकाणी संशयास्पद स्थितीत सापडला. या वेळी मात्र ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांवर रोष व्यक्त करून खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत बॉडी ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
    Maharashtra TimesAshok Kharat : लॅपटॉपमधून CCTV फूटेज काढले, खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधवला पोलीस संरक्षण; तरुणीच्या पोटावर उपकरण फिरवल्याचाही व्हिडिओ
    संशयावरून ताब्यात घेतलेल्या आरोपीने पोलिसी खाक्या दाखवताच दोन्ही खुनांची कबुली दिली. सध्या आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा