नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातच्या घाणेरड्या कृत्याने महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळलीय. विशेष म्हणजे या बाबासोबत अनेक बडे राजकीय नेते यांचे फोटोही व्हायरल होत असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय चाललंय असा प्रश्न पडतो. या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया चांगल्याच संतप्त झाल्या आहेत. रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली. राजीनामा देतानाही मॉडेलिंगसारखी पोज आणि अहंकार दिसत होता अशा शब्दात दमानियांनी चाकणकरांना फटकारलं. तर आतापर्यंत चाकणकरांना वाचवणारे हे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेच होते, असेही त्या म्हणाल्या. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावरही दमानियांनी निशाणा साधला. जयंत पाटलांची देखी चौकशी करण्यात यावी, असे त्या म्हणाल्या.