Pune Pregnant Woman Rescued: पुणे पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवून या महिलेची समजूत घालून तिला सुरक्षितपणे खाली आणले आणि मोठा अनर्थ टळला.
संबंधित महिलेने कौटुंबिक वादानंतर रागाच्या भरात घर सोडून थेट कात्रजचा डोंगर गाठला आणि एका धोकादायक कड्यावर जाऊन उभी राहिली. तिच्या मागे पतीही पोहोचला. पत्नी कड्यावर उभी असल्याचे पाहून घाबरलेल्या पतीने आरडाओरडा केला. तो तिला खाली येण्याची विनंती करीत होता. मात्र, संतापलेली पत्नी काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती.
Pune News : पुणे-सोलापूर हायवेवर प्रवाशांच्या जीवाशी खेळ, मध्यरात्री रस्ता ऑइलने माखला; अनेक गाड्या घसरल्या, लोणी स्टेशन परिसरात गंभीर प्रकार
कड्यावर उभी महिला आणि खाली हात जोडून आर्जव करणारा पुरुष हे चित्र रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या लक्षात आल्यावर खळबळ माजली. काहींनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून भारती विद्यापीठ पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाले. डोंगरकडा निसरडा असल्याने परिस्थिती अत्यंत बिकट होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत कौशल्याने दोरी आणि सुरक्षा साहित्याचा वापर करून महिलेच्या दिशेने कूच केले.
Summer Special Trains: उन्हाळी सुट्ट्या सुरु होण्यापूर्वीच रेल्वे फुल्ल; गाड्यांचा कोटा संपल्याने तिकीट बुकिंग थांबविले
एकीकडे पोलिसांनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जवानांनी सावधगिरी बाळगून तिला सुरक्षितपणे खाली आणले, तेव्हा तिथे जमलेल्या शेकडो नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पोलिसांनी महिलेचे समुपदेशन केले आणि तिला शांत केले. वेळेत मदत मिळाली नसती, तर या वादाचे पर्यवसान एका मोठ्या दुर्घटनेत झाले असते. देवदूताच्या रूपात धावून आलेले पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कामगिरीचे उपस्थितांनी कौतुक केले .
